Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवघ्या चार तासांच्या आत गुन्ह्याचा लावला छडा आरोपी अटक

चकलांबा परिसरात एकशिंगे साहेब व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे

चकलांबा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल हायवे 222 वर गाड्या लुटणार्‍या टोली अवघ्या चार तासांच्या आतमध्ये  म

पाकिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात 34 जणांचा मृत्यू
लोकशाही नव्हे, विरोधकांचे अस्तित्व धोक्यात ः पालकमंत्री विखे
क्रांतिकारकांनी जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही : आ. जयंत पाटील

चकलांबा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल हायवे 222 वर गाड्या लुटणार्‍या टोली अवघ्या चार तासांच्या आतमध्ये  मुद्देमालासह आरोपी अटक करण्यात आले.
चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील फुलसांगवी या गावातून मार्केटिंग साठी जाणारा औरंगाबाद जिल्ह्यातील टेम्पो चक-20 एङ-5570 तीन इसमानी अडवून त्यास पत्रकार व पोलीस असल्याचे सांगून फिर्यादी कडुन जबरदस्तीने 1800 रुपये काढून घेतले ही घटना दि.30/07/2023रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास  घडली . रात्री उशीर झाल्याने व सदरचा फिर्यादी घाबरल्याने फिर्यादी विष्णू शेषराव सुरवसे रा.सिल्लोड औरंगाबाद याने 31/07/023 रोजी येऊन चकलांबा पोलीस स्टेशन येथे गुरंन 222 /23 भादवि कलम 392, 341,170,34 प्रमाणे तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीआय नारायण एकशिंगे साहेबांनी आरोपीचे शोधकामी तात्काळ पथक पाठवण्यात आले. तात्काळ आरोपीचा शोध घेऊन व त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात  वापरलेली होंडा  शाईन मोटरसायकल किंमत 50000रू.  व आरोपी च्या अंग झडतीत जबरदस्तीने फिर्यादी कडून काढून घेण्यात आले 1800 रुपये असे एकूण 51800 रू.जप्त केला आहे . सदरची कारवाई ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.नारायण  एकशिंगे,पीएसआय इंगळे, हवालदार बारगजे, पो कॉ मिसाळ ,पो कॉ घोंगडे, यांनी केली असून सदर घटनेतील आरोपी तात्काळ अटक केल्यामुळे व त्यांच्याकडून  केल्यामुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. सध्या ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे यांनी गुन्ह्याचा  शोध व गुन्ह्याचे प्रतिबंध चे काम उत्कृष्टरित्या चालवल्याने समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना चांगलाच चाप बसला आहे .सध्या चकलांबा पोलीस स्टेशनची चालू असलेली धडाकेबाज कामगिरीमुळे जनसामान्यात पोलिसा विषयी चे कुलुशीत मते कमी होऊन विश्वासाहर्ता वाढण्यास मदत होणार आहे.

COMMENTS