Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यभूमी चे मुख्य संपादक बाळासाहेब मस्के व केज प्रतिनिधी रोहण गलांडे यांच्या वरील गुन्हे माघे घ्या

तलवाडा पत्रकार संघाच्या वतीने तलवाडा पोलीस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

तलवाडा प्रतिनिधी - संपादक बाळासाहेब मस्के व केज प्रतिनिधी यांच्या विरुध्द दबावतंत्र वापरून कार्यकर्त्या मार्फत वाकास कामा संदर्भात वृत्तपत्रात ब

युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला
चाकूरकरांच्या सून आज करणार भाजपमध्ये प्रवेश
महानाट्यातून अटलजींचा जीवनपट जगासमोर येणार

तलवाडा प्रतिनिधी – संपादक बाळासाहेब मस्के व केज प्रतिनिधी यांच्या विरुध्द दबावतंत्र वापरून कार्यकर्त्या मार्फत वाकास कामा संदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित केल्या म्हणून गुन्हा दाखल करून लोकशाहीची मुस्कटदाबी करण्यात आली असून सदर गुन्हा करण्यात आला आहे,सदर गुन्हा हा तत्काळ माघे घेण्यात यावा यासाठी तलवाडा पोलीस स्टेशन येथे पत्रकार यांच्या वतीने निवेदन सादर केले.
केज मतदार संघाच्या आ.नमिता मुंदडा यांच्या  कामासंदर्भात दैनिक पुण्यभूमीने जनतेतून उमटलेल्या प्रतिक्रियेचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर भाजप आ.नमिता मुंदडा, त्यांचे पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांचे कार्यकर्ते सुनिल देविदास घोळवे यांना पुढे करुन दैनिक पुण्यभूमीचे मुख्य संपादक बाळासाहेब मस्के, केज प्रतिनिधी रोहन गलांडे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सत्तेतल्या आमदार महोदयांना जनता प्रश्न विचारत असेल आणि त्या संदर्भात वृत्त प्रकाशित होत असेल तर यात बदनामी कशी काय होवू शकते. त्यामुळे या अशा अधिकार शाहिमुळे माध्यमाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गद्दा आली आहे. उद्या कोणीही उठेल आणि माध्यमांवर गुन्हा दाखल करील. म्हणून या गुन्ह्याचा आम्ही निषेध नोंदवित आहोत. केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी जनतेच्या विकासाची मुद्दे सोडविणे अपेक्षित आहे. मात्र कार्यकर्ते यांना पुढे करुन आणि पोलिसांवर दबाव टाकून हा गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे. सभागृहाच्या महिला प्रतिनिधीचे असे वर्तन योग्य नाही. त्यामुळे मा.साहेबांनी सदरील गुन्हा मागे घ्यावा आणि प्रसार माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावे  अशा आशयाचे निवेदन तलवाडा पोलीस स्टेशन चे  सपोनी शंकर वाघमोडे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक बीड यांना देण्यात आले यावेळी पत्रकार बापू गाडेकर,तुळशीराम वाघमारे,विष्णू राठोड,सुमेध करडे , व अल्ताफ कुरेशी हे उपस्थित होते.

COMMENTS