Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी अगस्ती शिक्षण संस्थेचे नाव मोठे करावे ः नाईकवाडी

अकोले ः बहुजनाची मुले शिकले पाहिजे या उदात्त हेतूने स्थापन केलेल्या अगस्ती शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपदान करून गावचे व शाळेचे

गटारीच्या निकृष्ट कामा बाबत अधिकारी व ठेकेदारांवर त्वरीत गुन्हा दाखल करा – दत्ता काले
जुन्या पेन्शनसाठी संपकरी कर्मचार्‍यांनी केली निदर्शने
ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24

अकोले ः बहुजनाची मुले शिकले पाहिजे या उदात्त हेतूने स्थापन केलेल्या अगस्ती शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपदान करून गावचे व शाळेचे नाव रोशन करावे. असे मत अगस्ती एजुकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी व्यक्त केले. कळस येथील कळसेश्‍वर विद्यालयात आयोजित इयत्ता दहावी च्या विध्यार्थ्यांच्या निरोप समारंभात नाईकवाडी बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे हे होते.
कार्यक्रमास शिरीष नाईकवाडी, माजी सरपंच यादव वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, कळस खुर्द सोसायटी चेअरमन पंढरीनाथ वाकचौरे, मच्छिन्द्र वाकचौरे आदी उपस्थित होते. दहावी हा जीवनातील महत्वाचा टप्पा असून येथे मिळालेले ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर उपयोगात आणावी असा सल्ला श्री. नाईकवाडी यांनी दिला. यावेळी आढळा विद्यालयाचे माजी मुख्याध्यपक रावसाहेब कोटकर, देवराम वाकचौरे, शिवाजी बिबवे अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, नंदा बिबवे यांची भाषणे झाली. सायली वाकचौरे, श्रावणी ढगे,अनुष्का झोडगे, स्नेहल हुलवळे, प्राची वाकचौरे, तेजस्वी वाकचौरे, प्रेरणा भोमले, साईराज झोडगे, श्रुतिका वाकचौरे, दीपिका नाईकवाडी या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल व शाळेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे यांनी कळस गावातील मुलीं मध्ये प्रथम येणार्‍या विध्यार्थिनीला अहिल्याबाई होळकर स्मृती पुरस्कार व पाचशे रुपये बक्षीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे गुणवंत गौरव सोहळ्यात दरवर्षी देण्याचे जाहीर केले. स्वाभिमानी सचिव संघटनचे विभागीय अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी प्रथम येणार्‍या विध्यार्थ्याला एक हजार रुपये तर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र सावंत यांनी प्रथम येणार्‍या आदिवासी विद्यार्थ्याला पाचशे रुपये बक्षीस जाहीर केले. यावेळी दहावी च्या विध्यार्थ्यांनी दोन डिजिटल बोर्ड शाळेला भेट दिले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  मुख्याध्यपिका सुनीता शेलार यांनी तर सूत्रसंचालन मच्छिंद्र साळुंखे व आभार कुमार पालवे यांनी मानले.

COMMENTS