Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्या

विरोधी पक्षनेते अजित पवारांची विधिमंडळात मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना निलंबित क

प्रेम प्रकरणातून जिवंत जाळलेल्या तरुणाचा मृत्यू | LOKNews24
दहावी-बारावीची आजपासून पुरवणी परीक्षा
विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ’रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधीत कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा तो पैसा एसटीच्या दुरुस्ती, देखभाल व कर्मचार्‍यांच्या हितासाठी वापरावा, अशी मागणाीही अजित पवार यांनी सभागृहात केली.
विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एसटी कर्मचार्‍यांच्या निलंबनाला विरोध करताना पवार म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना, मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राज्य शासनाची जाहीरात, मोडक्या, तुटक्या, फुटक्या, एसटी बसवर लावण्यात आल्याचेिउलट, सरकारने, आपला दोष लपवण्यासाठी, भूम एसटी आगाराचे, वाहन परीक्षक डी. बी. एडके, एस. एन. हराळ, ए. यु. शेख या तिघांना निलंबीत केले. खिडक्या नसणारी एसटी बस फेरीसाठी बाहेर काढण्यास कारणीभूत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला. आणखी काही जणांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे कळत आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे, ’रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असल्याचे पवार म्हणाले.

COMMENTS