Homeताज्या बातम्याशहरं

पाटण तालुक्यातील शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी; पाटण येथील बैठकीत निर्णय

पाटण / प्रतिनिधी : काहीही झाले तरी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा निर्धार पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या

राज्यातील ऊस परराज्यात निर्यातीवर बंदी
योग विद्येत प्रिया चव्हाण राज्यात चौथी; सातारा जिल्ह्यात द्वितीय
टाटा कमिन्स कंपनीचे दीड कोटीचे इंधन इंजेक्टरची चोरी

पाटण / प्रतिनिधी : काहीही झाले तरी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा निर्धार पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी बैठक घेऊन केला असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली. या पत्रकावर शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.
शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्‍वभूमीवर पाटण येथील शासकीय विश्रामगृहात काल शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेनेच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत शिवसेना पक्षात निर्माण झालेली दुफळी मोडून काढण्यासाठी आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार काम करण्यास तयार आहे. पाटण तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली. या बैठकीस उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील यांच्यासह उपतालुका प्रमुख संजय सपकाळ, राजकुमार कदम, युवासेनेचे अजय देसाई, अक्षय कदम, शहरप्रमुख शंकरराव कुंभार, संघटक डॉ. संदीप माने, मोरणा विभाग प्रमुख मोहन पवार, चाफळ विभाग प्रमुख सुरेश जाधव, कोयना विभाग प्रमुख सिताराम कदम, पाटण विभाग प्रमुख राजेंद्र पाटणकर, तारळे विभाग प्रमुख सोमनाथ काळण-पाटील, रविंद्र सपकाळ, रमेश कदम, भरत पवार, बबन माने, सुरेश चव्हाण यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS