Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीच्या मदतीने नवर्‍याने प्रेयसीला संपवले

मुंबई ः वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करून तरुणीचा मृतदेह वा

इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात
झिम्बाब्वेचे महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन
फडणवीस यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई ः वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करून तरुणीचा मृतदेह वापी नदीमध्ये फेकण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तपासात दोघांना अटक केली. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी वसईचा राहणारा असून तो विवाहित आहे. तसेच तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉस्टयूम डिझाईनचे काम करतो. याच ठिकाणी मृत तरुणी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. ती सनटेक येथील रहिवासी होती. मयत 28 वर्षीय तरुणी आणि आरोपीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

COMMENTS