Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी लाच स्वीकारताना वायरमन ला पकडले

अहमदनगर : घराचे बांधकाम करण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्याचे आवश्यक असल्याने विज पुरवठा बंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बाह्यस्रोत वायरमनल

Belapur : बेलापुरात भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव सुरु (Video)
५५० अनाथ, गोरगरीब मुलींचे लावले विवाह… शेख खलील चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार
“त्या” अदृश्य हातांमध्ये नगरचे संग्राम जगताप? : फडणवीसांनी मानलेल्या आभाराची चर्चा

अहमदनगर : घराचे बांधकाम करण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्याचे आवश्यक असल्याने विज पुरवठा बंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बाह्यस्रोत वायरमनला 2 हजार 500 रुपयाची लाच मागुन 2 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई जामखेड येथील रामेश्वर नगर येथे केली. यातील तक्रारदार यांचे रामेश्वर नगर, जामखेड येथे घराचे बांधकाम चालू असून त्यांच्या बांधकाम चालु असलेल्या प्लॉट समोर म.रा.वि.वि. कंपनीची विद्युत वहिनी असल्यामुळे विद्युत पुरवठा चालू असताना समोरील बाजूचे कामकाज करता येत नव्हते, त्यामुळे सुरक्षितरित्या बांधकाम करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करणे आवश्यक होते, त्यामुळे यातील तक्रारदार यांनी त्यांच्या भागातील वायरमन आलोसे अष्टेकर यांना विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी यापूर्वी 4 वेळा विद्युत पुरवठा 2 तासासाठी खंडीत करून दिला होता, त्यासाठी फी म्हणून 500 रुपये घेतले होते, दि.16 रोजी यातील आलोसे यांनी वीज खंडित करण्याचे प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे यापूर्वी 4 वेळा वीज खंडित केले बाबत व सकाळी वीज खंडित करणेसाठी असे एकूण पाच वेळा वीज खंडित करण्याचे 2 हजार 500 लाचेची मागणी करत असल्याची तक्रार ला प्र वि अ.नगर कडे प्राप्त झाली होती, त्यानुसार लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता यातील आलोसे यांनी प्रत्येक वेळी वीज खंडित करण्यासाठी 500 रुपये प्रमाणे 2 हजार 500 रुपये लाच मागणी करून 2 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे तसेच यापूर्वी 500 रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे देखील मान्य केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाले.पोलिसांनी बांधकाम चालू असलेल्या प्लॉट समोरील डी पी जवळ सापळा रचून 2 हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले  या प्रकरणी जामखेड पोलिसांनी 45 वर्षीय तक्रारदार (रा- वराट हॉस्पिटल शेजारी, खाडे नगर,जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाह्यस्रोत वायरमन संतोष शांतीनाथ अष्टेकर वय 41 वर्ष  जामखेड) यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS