लोणंद : हायमास्ट पोलच्या उद्घाटन प्रसंगी हणमंतराव शेळके-पाटील व उपस्थित मान्यवर. (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / वार्ताहर : गेली पाच वर्षे नगरसेवक
लोणंद / वार्ताहर : गेली पाच वर्षे नगरसेवक असताना प्रभाग क्रमांक 1 मध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. विकासकामे मार्गी लावत असताना प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचे खूप मोलाचे सहकार्य मिळत गेले.
प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेच्या समस्या सोडविण्यास कायम तत्पर राहणार आहे. ज्या-ज्या वेळी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज दिला जाईल. त्या-त्या वेळी मी कायम पुढे असेन. लोणंद नगरपंचायत निवडणूक लढविताना आज पराभावास सामोरे जावे लागले असले तरी पराभवाने न खचता जनतेची कामे करत राहणार असा विश्वास माजी नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील यांनी दिला आहे.
ते बेंद वस्ती येथील हायमास्ट पोल स्ट्रीट लाईटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी उमेश क्षीरसागर, महेश क्षीरसागर, सुरेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, मोहन क्षीरसागर, सुजित क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, आकाश क्षीरसागर, मयुर क्षीरसागर उपस्थित होते.
लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेमुळे हणमंतराव शेळके पाटील यांच्या कारकिर्दीतील येथील हायमास्टचे काम रखडले होते. निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर रखडलेल्या कामाचा पाठपुरावा करत हायमास्ट पोलचे उद्घाटन केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे उद्घाटन करत येथील समस्येला न्याय देता आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
नगरसेवक म्हणून हणमंतराव शेळके पाटील यांनी प्रभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःच्या कारकिर्दीत अपूर्ण राहिलेल्या कामाला पूर्ण करण्याची मानसिकता आजही ते दाखवत आहेत. काम तडीस नेहण्याचे कार्य आज ही त्यांच्याकडून होत असताना प्रभागातील समस्येला न्याय मिळवून देण्याची भूमिका पहायला मिळत आहे. रखडलेल्या कामांना या पुढे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
आ. मकरंद पाटील यांच्याकडून बेंद वस्तीवर 50 लाखाचा निधी हणमंतराव शेळके-पाटील यांनी उपलब्ध केला होता. रस्ता डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत मेन पाईपलाईन ही कामे देखील येत्या दोन महिन्यांत पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.
COMMENTS