महाविकास आघाडीत पडणार फूट ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीत पडणार फूट ?

सावरकरविरोधी वक्तव्यानंतर संजय राऊतांचे संकेत

मुंबई प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले

मराठमोळा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र अडकला विवाहबंधनात
तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला ?
अभिनेता विवेक ओबेरॉयची कोट्यावधींची फसवणूक

मुंबई प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले असतांनाच, शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay raut) यांनी महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे विधान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सावरकरविरोधी वक्तव्यावरून भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतांनाच आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीत फूटही पडू शकते, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
भारत जोडो यात्रा ही महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून ही यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत सावरकरांचा मुद्दा काढण्याची काहीच गरज नव्हती. या मुद्द्यामुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेसलाही धक्का बसला आहे. काँग्रेसच्याही अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. इतिहासात काय घडले, याकडे लक्ष देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नाही. तक्रारी दाखल करणे आणि प्रसिद्धी मिळवणे असा राजकीय उद्योग आपल्या देशात चालू आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतिहासकाळात काय घडले आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्याव असे राऊत यावेळी म्हणाले. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, बेरोजगारी, महागाई असे मुद्दे भारत जोडो यात्रेत असताना अचानक राहुल गांधींनी सावरकरांचा विषय का काढला? सावरकर कधीच भाजप आणि संघाचे आदर्श पुरुष नव्हते. त्यांचे आयडॉल्स वेगळेच होते. भाजपाचे सावरकर प्रेम नकली आणि ढोंगी आहे असे देखील राऊत यावेळी म्हणाले. अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे. असे वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होते.

सावरकरविरोधी वक्तव्यानंतर ठाकरे गटाची कोंडी – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आपण राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी कोंडी झाली. शिवसेनेची भूमिका आणि काँग्रेसची भूमीका दोन्ही विरुद्ध टोक असल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत अस्वस्थ आहेत. राहुल गांधींची सावरकरांबद्दलची भूमिका ठाकरे गटात अस्वस्थाता निर्माण करत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

COMMENTS