Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीमध्ये चौथा भिडू होणार दाखल ?

फडणवीस आणि मनसेमध्ये बंद दाराआड खलबते

मुंबई ः राज्यात सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंत

पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डबलगेम
तीन हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर विजय
वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी

मुंबई ः राज्यात सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतर आता महायुतीमध्ये देखील मनसेचा समावेश करण्याच्या हालचालींने वेग घेतला आहे.  मनसेच्या काही नेत्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सर्व नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून त्यामुळं मनसे व भाजप युतीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपला तिसर्‍यांदा सत्तेत यायचे असून पंतप्रधान मोदी यांनी 400 हून जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. हा निर्धार प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने देशातील सर्वच राज्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पक्की बांधबंदिस्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून भाजपने दोन्ही पक्षातील एकेक गट स्वत:सोबत घेतले आहेत. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे व शरद पवार हे जोमाने लढत आहेत. त्यामुळे भाजपने मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी आतापर्यंत ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला आहे. त्यात अपवाद वगळता त्यांना यश आलेले नाही. विधानसभेत हा पक्ष 13 आमदारांवरून एका आमदारावर आला आहे. तर, नाशिक महापालिकेतील सत्ताही गमावली आहे. आताच्या परिस्थितीत पुन्हा एकदा जम बसविण्याची संधी मनसेला आहे. मनसे नेते व फडणवीसांमधील भेटीकडे याच दृष्टीने पाहिले जात आहे. फडणवीसांची भेट घेणार्‍या मनसेच्या नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांचा समावेश होता. ही भेट सदिच्छा होती असे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. कोणत्याही पक्षासोबत जाण्यास राज ठाकरे हे फारसे अनुकूल नसल्याचे समजते. तर, युती करून सत्तेत सहभागी होता येईल असे कार्यकर्त्यांचे मत असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS