Homeताज्या बातम्यामनोरंजन

हृतिक रोशन आणि सबा आझाद अडकणार लग्नबंधनात ?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशन त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत महत्त्वा

राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन
सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मुलीच्या वडिलांचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात आग

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशन त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हृतिक दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं कळतंय. गेल्या काही महिन्यांपासून तो अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हृतिक दुसऱ्या लग्नासाठी सज्ज झाला आहे. त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याच्या या नात्याबद्दल खुश आहेत. हृतिकच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल त्याच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सांगितलं, “दोघंही लग्नाचा विचार करत आहेत. काहीच घाई नाही. या वर्षाच्या अखेरपर्यंत गोष्टी सुरळीत होतील आणि लग्नाबद्दल विचार करतील. सध्या तरी हृतिक आणि सबा प्रोफेशनली कमिटेड आहेत.” हृतिक हे दुसरं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करणार असल्याचंही त्या व्यक्तीने स्पष्ट केलं. या लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित असेल. हृतिकने 2000 मध्ये सुझान खानशी लग्न केलं. या दोघांना रेहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत.

COMMENTS