दीड कोटीच्या मुळीक पाणंद रस्त्याचा शुभारंभ ; ना. सुरेशभाऊ खाडे यांचे आभारइस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहराच्या विकासासाठी मंत्री पदाच्या क
दीड कोटीच्या मुळीक पाणंद रस्त्याचा शुभारंभ ; ना. सुरेशभाऊ खाडे यांचे आभार
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहराच्या विकासासाठी मंत्री पदाच्या काळत कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. मात्र, पद गेल्यानंतर आम्हाला बाजूला केले गेले. आता विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालीच इस्लामपूर पालिकेची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
ते इस्लामपूर येथील मुळीक पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी आ. भगवानराव साळुंखे, पालिकेचे गटनेते विक्रमभाऊ पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी नगरसेवक एल. एन. शहा, अमित ओसवाल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब पाटील, युवराज पाटील, दिग्वीजय पाटील, सतीश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
खोत म्हणाले, स्व. अशोक पाटील यांनी सर्वसमावेशक राजकारण केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विक्रमभाऊ पाटील यांची वाटचाल सुरू आहे. स्व. नानासाहेब महाडिक यांनी पालिकेत सत्तांतर करण्यासाठी विरोधकांची मोट बांधली होती. सत्ता आल्यानंतर आमचेच आम्हाला विसरून गेले. मंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला आम्हाला बोलवले ही नाही. पद मिळाले की मोठी माणसे जवळ येतात, छोटी माणसे दुर जातात. याउलट पद गेले की पहिल्यांदा मोठी माणसे दुर जातात छोटी माणसे जवळ येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घेवून पालिकेची निवडणुक लढवणार आहे.
विक्रम पाटील म्हणाले, मुळीक पाणंद रस्त्यावरून अनेक पुढारी ये-जा करतात. या रस्त्यासाठी त्यांना निधी आणता आला नाही. आम्ही पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून दिड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला. शहरातील रस्ते 20-20 वर्षे केले नाहीत. सत्ता नसतानाही मी निधी आणला आहे. आम्ही जे आश्वासन दिले ते पुर्ण केले आहे. शहराच्या विकासात योगदान देणार्यांच्या पाठीमागे जनात उभी राहते.
भाजप युवती नेते श्रेया जाधव, शंकर जाधव, माजी नगरसेवक एल. एन. शाह, चंद्रशेखर तांदळे यांची भाषणे झाली. यावेळी विजय पवार, धनराज पाटील, मोहन वळसे, संतोष वळसे, माणिक सुर्यवंशी, प्रकाश पोरवाल, गजानन फल्ले, रफिक तांबोळी, समीर मुल्ला, प्रकाश पाटील, हणमंत दळवी, महेश मुळीक, अजित निलाखे, सत्यजित जाधव, रोहित यादव, शिवराज यादव व शेतकरी उपस्थित होते.
इस्लामपूर : दीड कोटीच्या मुळीक पाणंद रस्त्याच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत व्यासपिठावर माजी आ. भगवानराव साळुंखे, विक्रमभाऊ पाटील, विजय कुंभार, अमीत ओसवाल, सतीश महाडिक व मान्यवर.
COMMENTS