सातारा / प्रतिनिधी : सातार्यात तब्बल 32 वर्षांनंतर 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी सार्वजनि

सातारा / प्रतिनिधी : सातार्यात तब्बल 32 वर्षांनंतर 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाल्यानंतर संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेण्यात आली. यावेळी संमेलन आणि मराठी भाषेच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. याप्रसंगी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सातार्यात मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्यावतीने 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु असून नियोजनाबाबत विविध बैठका सुरु आहेत. सातार्यातील संमेलनाच्या आयोजनातील महत्वाच्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप शाहूपुरी शाखेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, महेश सोनावणे, उद्योजक प्रसन्न देशमुख, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, संचालक अक्षय गवळी, मसाप शाहूपुरी शाखेचे सदस्य राजेश जोशी, वेदांत जोशी आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे संमेलनाची तयारी गतिमान होणार आहे.

COMMENTS