चेन्नई : वादळी चर्चेनंतर लोकसभेत बुधवारी मध्यरात्रीनंतर वक्फ सुधारणा विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसा

चेन्नई : वादळी चर्चेनंतर लोकसभेत बुधवारी मध्यरात्रीनंतर वक्फ सुधारणा विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. परंतु, तामिळनाडूत सत्ताधारी असलेल्या द्रविड मुणेद्र कडघम (डीएमके) पक्षाने या विधेयकाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. आपला पक्ष या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी स्टॅलिन विधानसभेत हाताला काळी पट्टी बांधून आले होते.
COMMENTS