Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या भ्रष्ट शिक्षण विभागावर कारवाई होईल का ?

शालेय शिक्षण विभाग अजूनही निद्रीस्त अवस्थेत

exclusive stamp. exclusive round grunge sign. label अशोक सोनवणे/अहमदनगर ः अहमदनगर-नगरचा बोगस शिक्षक भरती घोटाळा आणि संबंधित शिक्षण विभागाचे अधिका

मागासवर्गीय संस्थांच्या विरोधात महाधिवक्तांना उतरवणे योग्य का ?
पुणे प्रादेशिक सा.बां.विभागात निविदा घोटाळ्यांचा उच्चांक
पाच मंत्र्यांसह दहा सचिव आले आणि गेले
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

अशोक सोनवणे/अहमदनगर ः अहमदनगर-नगरचा बोगस शिक्षक भरती घोटाळा आणि संबंधित शिक्षण विभागाचे अधिकार्‍यांकडून कारवाई करण्यात चाललेली चालढकल दैनिक लोकमंथनने पाच भागांत प्रकाशित केली मात्र गेंड्याची कातडी पांघरलेली निद्रिस्त शिक्षण व्यवस्था अजुनही धिम्मचं असल्यामुळे या भ्रष्ट शिक्षण विभागावर खरचं कारवाई होईल का हा प्रत्येक शिक्षणप्रेमीला पडलेला प्रश्‍न आहे.
     शैक्षणिक क्षेत्रातील पैशांची हाव सुटलेले अधिकारी आणि राजकारणी यांचेमुळे शैक्षणिक व्यवस्थेला हानी पोहोचते. बहुसंख्य पालकांना  त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे. मात्र शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार चांगलाच मुरल्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांना डावलून सपास शिक्षक ज्ञानार्जन करु लागले.त्यामुळे शाळांची गुणवत्ता ढासाळली. विद्यार्थ्यांच्या  विकासाच्या संकल्पनेवर जोर देण्याऐवजी, आधुनिक शैक्षणिक संस्था पैसा कमावण्यावर आणि उपभोगवादावर भर देत आहे. शिक्षण क्षेत्राकडे पूर्वी पावित्र्याच्या नजरेनं बघितले जायचे.सध्याची शिक्षण व्यवस्था भ्रष्ट आणि किडलेली झाली आहे. शाळा या आता शिक्षणाचे माहेरघर राहिलेल्या नसुन, कमी दर्जाच्या शिक्षणाचे बाजारकेंद्र बनले आहेत. या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? असा प्रश्‍न कुणालाही पडतो. महसूल पोलिस प्रशासनाला लाजवेल असा भ्रष्टाचार सध्या शिक्षण क्षेत्रात नांदतो आहे. नगरच्या शिक्षक भरती घोटाळ्यात नगरचा माध्यमिक शिक्षण विभाग,संस्थाचालक त्यावर पांघरूण घालणारे शिक्षण उपसंचालक एकंदर सचिवालयापर्यंत याची पालेमुळे खोलवर रुजलेली असल्यामुळे अनेकांनी तक्रारी करुनही शासनाकडे अपत्याची खोटी माहिती सादर करुन पाच महिने बडतर्फ केलेले अशोक कडूस पुन्हा शिक्षणाधिकारी (माध्य) पदावर रुढ झाले. एवढेच काय तर माहिती अधिकारातही त्यांचेवर दंडात्मक कारवाई झालेली आहे. 6 फेब्रुवारी 2019 मिनाक्षी राऊत शिक्षण उपसंचालक पुणे यांनी चक्क या पत्रात संदर्भच पुढील तारखेचा देऊन चांगलीच करामत केली आहे.एकंदर कुणाचाही कुणावर वचक नाही कागदी घोडे नाचवतानाही अज्ञानपणाचा कळस केलेले हे शिक्षण क्षेत्रातील लबाड विद्वान मंडळी जास्त काळ खुर्चीत बसणार असतील तर भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबाचा विचार न केलेलाच बरा.

COMMENTS