Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री असतांना एमआयडीसीचा प्रश्‍न का सोडवला नाही

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नामदेव थोरात यांचा सवाल

कर्जत ः शिंदे साहेब यांनी पाच वर्षात एमआयडीसीचा प्रश्‍न सोडवला नाही. ते आता जवळ काही नसताना एमआयडीसीचा प्रश्‍न सोडवला असे खोटे आश्‍वासन देत आहेत.

LokNews24 lसंभाजी राजे यांची न्यायासाठी न्याय प्राप्ती संघर्ष
वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक: डॉ. भोसले
प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई

कर्जत ः शिंदे साहेब यांनी पाच वर्षात एमआयडीसीचा प्रश्‍न सोडवला नाही. ते आता जवळ काही नसताना एमआयडीसीचा प्रश्‍न सोडवला असे खोटे आश्‍वासन देत आहेत. त्यामुळे जनतेची फसवणूक कोण करत आहे हे त्यांच्या बोलण्यावरून व वागण्यावरून लक्षात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे एमआयडीसीची पाहणी करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी नृत्यांगण गौतमी पाटील येऊन जाते. त्यामुळे अशा खोट्या एमआयडीसीच्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी अतिशय प्रामाणिकपणे विधानसभेच्या वरिष्ठ सभागृहात दोन ते तीन वेळा हा प्रश्‍न मांडला. रोहितदादांनी एमआयडीसी आणि एसटी डेपोचा प्रश्‍न मांडताना सर्वांनी पाहिले आहे. एमआयडीसीच्या प्रश्‍न पूर्ण ताकतीने कागदपत्रांसह सादर करत मंजूर करून घेतला. एमआयडीसीचा आणि एसटी डेपोचा प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

COMMENTS