नाशिक प्रतिनिधी - नाशिक शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनाचे ई-लोकार्पण कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व दिव्यांग विभाग मंत्रालयाच

नाशिक प्रतिनिधी – नाशिक शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनाचे ई-लोकार्पण कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करत आ. बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्घाटन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.12) सकाळी महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने आ. बच्चुभाऊ कडू यांना माहिती न देता ऐनवेळी फोन करुन कार्यक्रमाची माहिती दिली हे योग्य नाही, त्याच प्रमाणे कार्यक्रम पत्रिकेत आ.बच्चू कडू यांच्या नावाचा चूकीचा उल्लेख म्हणजे जाणीवपूर्वक टाळले गेले आहे, त्यामुळे प्रशासनाने दहा दिवसांत नव्याने नियोजन करुन पुन्हा कार्यक्रम घ्यावा, यावर निर्णय न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी दिला.
यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, उत्तर महाराष्ट्र दिव्यांग प्रमुख जेकब पिल्ले, महाराष्ट्र समन्वयक संध्या जाधव, वैशाली अनवट, सीमा पवार, संतोष मानकर, भाउसाहेब सांगळे, यशवंत सापुते आदी उपस्थित होते.
COMMENTS