नवी दिल्ली :राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस कुणाची, याचा फैसला अजूनही लागलेला नाही. त्यातच
नवी दिल्ली :राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस कुणाची, याचा फैसला अजूनही लागलेला नाही. त्यातच गुरूवारी होणारी सुनावणी टळली असून, 10 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होणार असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल अंधातरी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल लावावा अशी मागणी उद्धव ठाकरे तथा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र आता आचारसंहिता लागली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहे. यानंतरही अद्याप या प्रकरणाचा निकाल समोर आलेला नाही. या प्रकरणाची गुरूवारी होणारी सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली असून आता मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे दहा नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी या प्रकरणाची सुनावणीसाठी सहा दिवस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागला नाही, तर हे प्रकरण पुन्हा नवीन न्याय पीठासमोर जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या प्रकरणाची सुनावणी आणखी लांबणीवर पडू शकते.
लवकर सुनावणी होण्याची शक्यता कमीच
खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यासंदर्भातील फैसला लवकर होण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण दोन्ही दोन्ही बाजूच्या वकीलांनी हे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्याची विनंती करायला आली हवी होती. मात्र आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात आणि आतापर्यंत तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणावर निवडणुकीच्या आधी सुनावणी होण्याची शक्यता तशी कमीच दिसून येत आहे. त्यामुळे खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला लवकर होण्याची शक्यता कमीच आहे.
COMMENTS