Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?

पुणतांबा ः ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच निवडीसाठी 24 नोव्हेंबरला शुक्रवारी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलवण्यात आली असून उपसरपंचपदी को

सादिकच्या मृत्यूचे गूढ वाढले…वरिष्ठांना पाठवला अहवाल ; मुकुंदनगर परिसरात बंदोबस्त वाढवला, चौकशी अहवालाची प्रतीक्षा
जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ध्रुवला सहा पदके
विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत आ. तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट 

पुणतांबा ः ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच निवडीसाठी 24 नोव्हेंबरला शुक्रवारी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलवण्यात आली असून उपसरपंचपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सर्व नवनिर्वाचित सदस्यांना बैठकीची नोटीस देण्यात आली आहे.
पाच नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतची निवडणूक झाली तिरंगी लढतीत युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आघाडीने नऊ जागा जिंकून तसेच सरपंचपदी स्वाती पवार विजय झाल्या होत्या. या निवडणुकीत कोल्हे गटाला निर्विवाद वर्चस्व मिळाले तर जनसेवा व लोकसेवा मंडळाला प्रत्येकी चार जागा मिळाल्या होत्या. सरपंच पदी स्वाती पवार या कार्यभार कधी घेणार तसेच उपसरपंच पदाची निवड कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढून चोवीस नोव्हेंबरला सरपंच स्वाती पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावली असून त्यात उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सत्ताधारी विकास आघाडी उपसरपंच पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उपसरपंच पदाबाबत विशेष चर्चा गावात रंगू लागले आहेत. विकास आघाडीकडे नऊ सदस्य निवडून आल्यामुळे उपसरपंचपद त्यांच्याकडे जाणार हे निश्‍चित आहे. विकास आघाडीकडून उपसरपंच पदासाठी निकिता जाधव, प्रभाकर बोर बने, अनिल नळे, वंदना वाटेकर या स्पर्धेत असून उपसरपंच पदाबाबत कोल्हे निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे उपसरपंच पदाची माळ कोणाच्या पारड्यात पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. विवेक कोल्हे याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्यामुळे कोल्हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतच्या विरोधी गटाकडे आठ सदस्य निवडून आले आहे, त्यामुळे विरोधी गटातून उपसरपंच पदाबाबत अर्ज दाखल होणार का नाही हे अद्याप निश्‍चित झाले नसले तर सध्या सर्वत्र विरोधी गट उपसरपंच पदाबाबत अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते त्यामुळे विरोधी गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे जनसेवा मंडळाकडे चार जागा असून आमदार आशुतोष काळे यांच्या लोकसेवा मंडळाकडे चार जागा आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांना आदेश देणार की नाही हे बघावे लागणार आहे.

COMMENTS