चांदोली व शाहुवाडी वन क्षेत्रपालांनी मुद्देमाल ताब्यात घेत पंचनामा केला खरा पण चोरी झाली असे सांगून तपास सुरु असल्याचे बोलले जात आहे. पण कोणास पा
चांदोली व शाहुवाडी वन क्षेत्रपालांनी मुद्देमाल ताब्यात घेत पंचनामा केला खरा पण चोरी झाली असे सांगून तपास सुरु असल्याचे बोलले जात आहे. पण कोणास पाठीशी घालण्याचा डाव तर नाही ना! अशीच परिस्थिती राहिली तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डोंगर माफियाकडून बोडके झाल्याशिवाय राहणार नाहीत. अवैध वृक्षतोडीला आळा बसण्याऐवजी त्याला प्रोत्साहनच मिळत राहील.
कुणाचा आर्शिवाद माफीयांच्या माथ्यावर?
वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सामिल?
शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन व व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असणार्या प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत झालेल्या वृक्ष तोडीचे खरे सुत्रधार कोण? कोणाची मेहरबानीवर चोरटे मोकाट फिरत आहेत हा प्रश्न अनुत्तरीत राहणार कि काय असे निसर्ग प्रेमीबरोबर स्थानिक रहिवासी करू लागले आहेत. याला कारणे ही तशीच आहेत. गेल्या दोन वर्षापासून शाहुवाडी तालुक्यात वृक्षतोड जोमाने सुरु आहे. ही बाब वन्यजीव व प्रादेशिक वन खात्याला माहिती नाही. हे मात्र आंधळं दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय या म्हणी प्रमाणे उजेडात येवुनही सह्याद्रीचे डोंगर उघडे पडत असताना संबधीत अधिकारी गांधारीच्या भुमीकेत का? हा सवाल सर्व सामान्य जनतेला पडलेला न उलघडणारा प्रश्न याच वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी उजेडात आणणार का? तसेच याची संपूर्ण चौकशी करतील की कालांतराने अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करत तपास चालू आहे, म्हणत गुंतलेल्या अधिकार्यांची चिरीमिरीसाठी पाठराखण करत फाईल तर बंद होणार नाहीना?
तत्कालीन शाहूवाडीचे वनक्षेत्रपाल यांच्या व इतर सहकार्यांच्या आर्शिवादने झालेल्या वृक्षतोडीचा धडा कार्यरत वनक्षेत्रपाल गिरवत तर नाहीतना. या सर्व बाबी डोळ्यांसमोर असूनही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र जाणीव पुर्वक कानाडोळा करत आहेत. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. ही वृक्ष तोड आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत असणार्या वन्यजीवमध्ये सुरु आहे. त्याचे कारण ही तसेच आहे.
शाहुवाडीचे प्रादेशिकचे वनक्षेत्रापाल सहा महिण्यापूर्वी बदली होवुन शाहूवाडी तालुक्याच्या लगत असणार्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात नियुक्त झाले. उद्यानाचा कारभार त्यांच्या हाती आल्याने शाहूवाडीतील भेडेवडे गावची वृक्षतोडी बरोबर आता चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वृक्ष तोडीसाठी वृक्षतोड माफीयांना घुसयला वेळ लागला नाही. चांदोली राष्ट्रीय उद्यानात वृक्ष तोड करता येत नाही, असे असताना तोड झाली व ती प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असणार्या शाहुवाडी तालुक्यातील भेडवडे, इनामदारवाडी येथे झालेली बेकायदेशीर वृक्ष तोड वन विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांना खबर्यांद्वारे वृक्षतोडी विरोधात मानद वनरक्षक रोहन भाटे यांच्याकडे तक्रार केली होती. तद्नंतर भाटे यांनी अधिकार्यांना कारवाईस भाग पाडले कारवाई झाली पण अरोपीचे काय?
COMMENTS