Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिपचा ई-मेल मिळाला नाही ; शिंदे गटाचा दावा

आमदार अपात्रततेची सुनावणी 21 नोव्हेंबरला

मुंबई ः आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरूवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये

संगमनेरमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन
अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
संपामुळं राज्यात वीज संकट गडद | DAINIK LOKMNTHAN

मुंबई ः आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरूवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आम्हाला व्हिपचा ई-मेलच मिळाला नसल्याचा मोठा दावा शिंदे गटाने केला आहे. शिवाय याप्रकरणाची पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शिंदे गटाला दिले आहेत.
तसेच या प्रकरणाची कागदपत्रे ही 16 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहेत. दीड तास झालेल्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केले नसल्याचे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु झाली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण 34 याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी सुरू असलेल्या या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी सुनावणीला उपस्थित आहेत. तर शिंदे गटाचे कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये ई मेलवरच्या व्हिपवरून जोरदार युक्तिवाद झाल्याचे दिसून आले.

COMMENTS