Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेथे पुस्तक तेथे भारी मस्तक ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः वाचन संस्कृती म्हणजे उच्चतम जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना होय. ज्ञानदीप लावू जगी या जाणिवेतून वाचन संस्कृती उगवत्या पिढीत रुजविली पाहिज

रसाळगुरूजींचे रसाळ ’बोधामृत’ जीवनपोषक ः डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर हे वाचन संस्कृतीचे माहेरघर होय ः डॉ. बाबुराव उपाध्ये              
अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे आहेत ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः वाचन संस्कृती म्हणजे उच्चतम जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना होय. ज्ञानदीप लावू जगी या जाणिवेतून वाचन संस्कृती उगवत्या पिढीत रुजविली पाहिजे, कारण जेथे पुस्तक तेथे भारी मस्तक घडते, वाचन संस्कृती ही जीवन संजीवनी आहे त्यासाठी ग्रंथ हे जीवनसांगाती बनावे, वाचेल तोच वाचेल असे आजचे ज्ञानप्रधान युग आहे असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचालित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेवासा फाटा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःक्षाल शिक्षण मंडळ अंतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आयोजित उद्घाटनचे प्रथम विचारपुष्प गुंफताना डॉ. बाबुराव उपाध्ये हे’ वाचन संस्कृती काळाची गरज’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार, नेवासा टाईम्सचे माजी संस्थापक, अ‍ॅड. बाळासाहेब तनपुरे, श्रीरामपूर वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव बारगळ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सी.एस  आरसुळे होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीगुरुदेवदत्त आणि श्रीसस्वतीमाता देवी प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. उपप्राचार्या निकिता बर्गे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. आरसुळे यांनी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्पे देऊन स्वागत, सत्कार केले. बहिःशालचे केंद्रप्रमुख प्रा. विनोद शिनगारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी पौराणिक, प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि जागतिकरण युगातील ग्रंथसंदर्भ देत मानवी प्रगतीचा आढावा घेतला. तसेच डॉ. उपाध्ये यांनी उपस्थित मान्यवर आणि सर्व विद्यार्थ्यांना 60-70 पुस्तके भेट दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड, बाळासाहेब तनपुरे म्हणाले, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल हे ज्ञानाचे आणि जनसेवेचे मंदिर आहे, ते उभारण्यात शिक्षणतपस्वी साहेबराव घाडगे पाटील आणि सौ. सुमतीताई घाडगे पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आदर्श येथे उभा केला आहे, त्यांनी अशा उपक्रमाचे सेवातीर्थ श्रीगुरुदेव दत्ताच्या आशीर्वादाने सुरु केले, हे कौतुकास्पद असल्याचे सांगून आपल्या पत्रकारितेच्या आठवणी सांगितल्या. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी जिल्ह्याच्या गावोगावी , कानाकोपर्‍यात    साहित्यसेवा केली, करीत आहेत  त्यांचे 52 ग्रंथ म्हणजे समाज प्रबोधनाची ज्ञानज्योत आहे. प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य शंकरराव अनारसे, सुखदेव सुकळे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या समवेत मी या वाचन संस्कृती चळवळीला वाहून घेतले आहे, वाचनातून माणूस माणुसकीसंपन्न होतो आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहतो असे सांगून त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल पाहून आपण धन्य झाल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. आरसुळे यांनी अध्यक्षीय भाषणातून त्रिमूर्ती शेक्षणिक संकुलाचे मोठेपण सांगितले. यावेळी प्रा. राजेंद्र कात्रस,प्रा. पाचारणे, प्रा. जावळे, प्रा. खेडकर, ऋतुजा धुमाळ, मनिषा सोमासे आदिंनी सहकार्य केले. सूत्रसचालन पूजा डोईफोडे यांनी केले तर प्रा. कांचन शेळके यांनी आभार मानले.

COMMENTS