Homeताज्या बातम्यादेश

लग्नात नवरदेवाने मोटारसायकलची मागणी केल्यावर सासऱ्याने चप्पलेने मारहाण केली

हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकार ने कडक कायदे केले आहे. हुंडा देणे आणि घेणे दोन्हीसाठी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तरीही काही लोक अजून देखील

ब्राह्मणांना दुसरा देश कसा देणार ?
राहुरीत भाजीपाला विकणार्‍या शेतकर्‍यांची हेळसांड
कांद्यानंतर आता साखरेवर निर्यातबंदीचे संकेत

हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकार ने कडक कायदे केले आहे. हुंडा देणे आणि घेणे दोन्हीसाठी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तरीही काही लोक अजून देखील हुंडा मागताना दिसतात. सोशल मीडियावर नवरदेवाने हुंड्यात मोटार सायकल ची मागणी केल्यावर सासरच्या मंडळींनी चपलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे.या व्हिडीओ मध्ये वर आणि वधू दोघे लग्नासाठी तयार उभे आहे. हुंड्यात नवरदेवाने मोटारसायकिलची मागणी केल्यावर सासरचे लोक संतापले आणि चक्क चपलेने मारहाण करू लागले. नंतर मुलाकडे लोक चुकीची माफी मागताना दिसत आहे. सदर व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकला नाही. काही यूजर म्हणतात की हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. तर काही लोकांचा दावा आहे की हा व्हिडीओ समाजातील हुंडा प्रथेच्या विरोधात संदेश देण्यासाठी बनवला आहे. या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टता अद्याप होऊ शकली नाही.

COMMENTS