Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गहू उत्पादनात 50 लाख टनांची वाढ होणार

पुणे/प्रतिनिधी ः अनुकूल हवामान आणि लागवडीच्या क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत पन्ना

ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट
नगरला धोका ठरणारा पाझर तलाव होणार दुरुस्त ; हिवरे बाजारच्या प्रस्तावास मान्यता

पुणे/प्रतिनिधी ः अनुकूल हवामान आणि लागवडीच्या क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आईसीएआर) भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्राने वर्तविली आहे. मध्य प्रदेश, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहार ही देशातील मुख्य गहू उत्पादक राज्ये आहेत. आता गहू पीक पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. गेले 40-45 दिवस उत्तर भारतात चांगली थंडी पडली होती. त्याचा परिणाम म्हणून गव्हाचे पीक जोमदार आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी तीन टक्क्यांनी वाढले आहे. 2022 मध्ये रब्बीचे क्षेत्र  678.78 लाख हेक्टर होते. यंदा त्यात वाढ होऊन 700.92 हेक्टरवर गेले आहे. 22.14 लाख हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. केवळ गव्हाचा विचार करता 2022 मध्ये देशात गव्हाच्या पिकाखालील क्षेत्र 340.56 हेक्टर होते. त्यात वाढ होऊन यंदा 341.85 हेक्टरवर गेले आहे. सरासरीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र 1.29 लाख हेक्टरने म्हणजे 0.37 टक्क्यांनी वाढले आहे. याचाही फायदा गव्हाच्या उत्पादनवाढीस होणार आहे.

COMMENTS