माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड काय घेणार भूमिका ; स्वतंत्र आघाडी की राष्ट्रवादी ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड काय घेणार भूमिका ; स्वतंत्र आघाडी की राष्ट्रवादी ?

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील राजकारणात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत माजी नगराध्यक्ष

गटसचिवांना जिल्हा बॅंकने वैदयकिय विमा सुरक्षा कवच दयावे : कोल्हे
वीस खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक
कोपरगाव शहर पोलिसांची गावठी दारू हातभट्टीवर धाड

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील राजकारणात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे.तसेच त्यांची राजकीय भूमिकाही स्पष्ट केली आहे.दरम्यान माजी नगराध्यक्ष आव्हाड स्वतंत्र आघाडी करत निवडणुकीत उतरतात की कोणत्या पक्षात प्रवेश करत निवडणुक लढवतात.याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या काळात शहरातील प्रभागात भरीव कामे झाली होती.मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेवटच्या काही दिवसांत वेगवेगळ्या राजकीय घडामोडीत अभय आव्हाड हे त्यांनी तयार केलेल्या स्वतंत्र आघाडीसह निवडणुक लढू शकले नाहीत.
मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाची भूमिकेनुसार आव्हाड यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मृत्यूजय गर्जे यांच्या प्रचारात सहभागी होत.शहरातील आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून गर्जे यांना नगराध्यक्ष करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.परंतु या वर्षीच्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे गटाकडून अभय आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने. त्यांच्यातील व विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यातील राजकीय अंतर वाढले.तसेच अभय आव्हाड यांना शहरातील भाजपच्या कार्यक्रमातुन टाळले जाऊ लागल्याने मागील काही दिवसांपासुन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनीही भाजपाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहत आपली नाराजी व्यक्त केली होती. अभय आव्हाड हे खासदार डॉ. सुजय विखे यांचे खंदे समर्थक असून खासदार डॉ.सुजय विखे जेव्हा काँग्रेसमध्ये होते.तेव्हा पाथर्डी तालुक्यात विखे यांना आव्हाड यांनी पक्षविरहित मैत्री जपत मदत केली होती.तसेच अभय आव्हाड यांनाही एखादे चांगले पद मिळावे.ही माझी मनापासून इच्छा असल्याची विखे यांनी कार्यक्रमात बोलून दाखवले.आता आव्हाड यांच्या राजकीय भूमिकेनंतर विखे त्यांना कशी साथ देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.तर माजी नगराध्यक्ष आव्हाड व त्यांचे राष्ट्रवादीचे नवे मित्र बंडू बोरुडे यांची बालाजी आघाडी ही मागील काही दिवसापासुन समाजमाध्यमातुन प्रसिद्ध झाली आहे.येणाऱ्या निवडणुकीत अभय आव्हाड बालाजी आघाडी या स्वतंत्र आघाडीसोबत निवडणुकीत लढवतात की कुठल्या पक्षामार्फत याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS