Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपुर पोलीस ठाण्यात चाललंय तरी काय ?

जीव घेणा हल्ला करून सुद्धा आरोपी मोकाट कसे

नाशिक प्रतिनिधी  - सध्या नाशिक मध्ये कौटुंबिक आणि सामाजिक भांडणे वाढण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने समुळ समस्यांचे निदान होतांना दिसत नसल्याचे चित्र

हिम्मत असेल तर बुलढाण्यातून माझ्या विरोधात लोकसभा निवडून दाखवा
सेवानिवृत्त तपासणीस एस पी जाधव यांचा सत्कार
जामखेड कर्जतमध्ये प्रस्थापिताविरोधात आम्ही सर्व ः फडणवीस

नाशिक प्रतिनिधी  – सध्या नाशिक मध्ये कौटुंबिक आणि सामाजिक भांडणे वाढण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने समुळ समस्यांचे निदान होतांना दिसत नसल्याचे चित्र काही का होईना ह्या समाजातल्या घटकांकडून वारंवार ऐकीवात येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे होईल एवढे पोलीस प्रशासनाने आज पर्यंत काही काम केलेले नाहीत मात्र अनवधानाने काही अशा केसेस पोलीस प्रशासनाच्या हाती येऊन सुद्धा मागे राहत असल्यास त्याचा उपयोग नागरीकांना होत नाहीत. त्यामुळे काही घटकांतील भांडणे हे अधोरेखित करण्यासारखे असल्याने त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असतांना तक्रारदार आणि आरोपी  यांची माहिती खरी की खोटी ही शहानिशा वास्तविक समोरासमोर पोलीस ठाण्यात व्हायला हवी. असे असतांना देखील त्याकडे दुर्लक्षच जर होत असेल तर आपली पुष्टी दैनिक लोकमंथन करत नाहीत. 

सातपुर परिसरात वारंवार अशा घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता साधारण मे महिन्यात सातपुर  परिसरात खळबळजनक घटना घडलेली असतांना साधी एफआयआर नोंदवून पुढील प्रकिया निश्चितच निष्क्रिय ठरली असल्याचे तक्रारदार याने बोलवून दाखविल्याने घटनेचे गंभीर स्वरूप लक्षात येते. सातपुर परिसरातील तक्रारदार याने सातपुर पोलीस ठाण्यात योग्य काम होत नसल्याने शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देऊनही दखल घेतली गेली नसल्याची माहिती दिली आहेत. त्यामुळे सातपुर पोलीस निरीक्षक व सहकर्मचारी काय करतात ! असा सवाल का पडू नये ? पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाने तक्रारदार यास योग्य न्याय मिळणे अपेक्षित आहेत. 

COMMENTS