Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सन्मानाचं काय झालं ?

हरित बीड भकास बीड- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - शहर हरित करण्यासाठी नगरपालिकेने शहरभर झाडे लावल्याचा बोभाटा केला,मात्र झाडे जोपासण्यात अपयशी ठरलेली नगरपालिका विकासकामाच्या नावाख

वृक्षतोडप्रकरणी कर्जत महावितरणला नोटीस
ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : पालकमंत्री हसन मुश्रीफ
बिहारमध्ये दलितांची 80 घरे जाळली

बीड प्रतिनिधी – शहर हरित करण्यासाठी नगरपालिकेने शहरभर झाडे लावल्याचा बोभाटा केला,मात्र झाडे जोपासण्यात अपयशी ठरलेली नगरपालिका विकासकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडून शहर भकास करत आहे.त्यामुळे एकंदरीत केवळ नेते व अधिकारी चरण्यासाठीच झाडे लावण्याचे षडयंत्र केले होते का??असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्यातील नगरपालिकांच्या हद्दीत विविध पर्यावरणपुरक कामे राबवणा-या नगरपालिकांचा राज्य शासनाकडून आँनलाईन सन्मान करण्यात येतो.दि.22 जानेवारी 2022 रोजी आठवड्यांचे मानकरी म्हणून बीड नगरपालिका ठरली होती,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील वृक्षसंपदा वाढवण्यासाठी 6000 स्थानिक प्रजातींच्या वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात येत आहे.नव्याने तयार केलेल्या 4 हरीत क्षेत्रांचा विकास करण्यात आला.जुन्या आणि नव्या निर्मित केलेल्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल सुरू आहे ज्यात जैवविविधतेच्या संवर्धनावर भर दिला आहे.तत्कालीन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर व मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांचा आँनलाईन सन्मान करण्यात आला होता. माझी वसुंधरा अभियानाची माहिती बीड शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरात विविध ठिकाणी वाल पेंटींगच्या माध्यमातून जनजागृती केली जात असुन शहरात 5 हजार 100 हुन अधिक माझी वसुंधरा मित्र परिवार सदस्य संख्या असल्याचे दाखवले होते व अभियान अंतर्गत शहराची पर्यावरण पूरक वाटचाल सुरू असल्याचे नमूद केले होते.मग वाल पेंटींग माध्यमातून केलेली जनजागृती केवळ कागदावरच का??असाही प्रश्न बीडकरांना पडला आहे.

COMMENTS