योगेश रोकडे नाशिक - अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर !आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर !! (संत बहिणाबाई) खर तर ! महाराष्ट्र ही साधु सं
योगेश रोकडे नाशिक – अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर !आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर !! (संत बहिणाबाई)
खर तर ! महाराष्ट्र ही साधु संतांची पावन भूमी आहेत. समाजालाच नव्हे तर जगाला ज्ञान पाजळणारी आपली माय मराठी संस्कृती आहेत. आपल्या महाराष्ट्र संस्कृतीने जगाला दिशा दिली. संत बहिणाबाई , संत जनाबाई , माँ साहेब माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले , अहिल्याबाई होळकर अशा महान नारी शक्तीने आमचा महाराष्ट्र घडविला आणि संस्कृती जोपासली.त्यांनी आमच्याकडे कुठलाही विचार न करता संस्कृती आमच्या स्वाधीन केली आणि आम्ही मात्र आज बेजबाबदार पणे वागून आपल्या पूर्वजांचे असे पांग फेडतो आहेत.
आमच्या ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबांनी सुंदर बैठकीच्या लावणीचे वर्णन केले आहेत.
अगदी लावणी आमच्या जनतेने खूपच डोक्यावर घेतली तीच लावणी सुरेखा पुणेकर यांनी बऱ्याच वेळा तमाशा फडात आणि विविध ठिकाणी देखील केल्या मात्र कुठेही जनतेला त्रास होईल इतपत तरी आगाऊपणा पुणेकर यांनी नाही केला.
मात्र अलीकडे गौतमी ही पैसे कमावण्यासाठी नाचता नाचता आपलं शरीर लोकांना दाखवून बरेच अज्ञानी लोकांना आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु तुझे हे पैसे कमावण्याचे धंदे अनेक लोकांची घरे तर उधवस्थ करणार नाही ना ? असा कधी विचार केलाय का तू ? कसा करणार तुला ठीक बोलता येत नाही ! नाचता देखील येत नाही ? गोऱ्या गुमट्या अंगाचा काहीतरी नादान पोरीसारखी टिर्या वर करून तू दाखवतेस ! यापलीकडे दुसरे काय ? ठीक आहेत तुझे ते प्रोपेशन ! कौटुंबिक छळ झाला वगैरे वगैरे ….अशा आमच्या माता बघिणी खूप आहेत परंतु सडेतोड उत्तर देत जगताहेत.
आणि आमची माणसं आज तमाशा सोडून लावणी महोत्सव सोडून हा संस्कृती ला विकृतीच्या दिशेने घेऊन जाणारा कार्यक्रम करतात.? तिला गावात – शहरात आणून आपल्या आया बहिणींना काय तिच्या पोटऱ्या दाखवतात.! काय घेतोय काय आम्ही तिच्याकडून ? आमची मराठी पोर बिगर लग्नाची हाय अजून, वय झाली लग्न नाहीत.आणि ती बिगर लग्नाची बया नाचते तेव्हा आमचा मराठी तरुण अजून बिघडतो आहेत. अश्लील पणा हा खर तर माहीत असतांना देखील लपवायचा असतो जनेकरून पुढची पिढी ही बरबाद होऊ नये . वास्तविक तिचे पोट भरण्यासाठी ती करते तर कुणाला दुःख वाटू नये. परंतु तिने चांगला तमाशा फड उभारावा लावणी महोत्सव आयोजित असेल तरच आपली कला सादर करावी. तिला ” ना ” कुणाचीच नाही मात्र आज बुरसटत चाललेली माझी माणसं जागी होतील का ? आमच्या नाशकात काल गौतमी पाटील चा धिंगाडा महोत्सव आयोजीत केला होता म्हणे ३००,५००,१०००,२०००/- असे तिकिटाचे दर होते आमचे पत्रकार बांधव बातमी कवर करायला गेले आणि नास्तिक लोकांच्या तावडीत सापडले… पोलीस प्रशासनाची कार्यक्रमास परवानगी होतीच मात्र मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याने पत्रकार आणि फोटोग्राफर यांवर देखील भ्याड हल्ला केला. गौतमीच्या मादक आणि अश्लील लिला बघणारे बघे यांना सारवा सारव करत पुढे जाऊन बातमी साठी फुटेज शूटिंग करणारे पत्रकार व फोटोग्राफर बांधव यांच्यावर रक्तबंबाळ होई पर्यंत आयोजकांनी नियोजन केले होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो !
ळात ही बया जिथे नाचायला जाते तिथे कार्यकर्ते हमखास राडा घालतात मग आम्ही तर शहाने आहोत तरी तिला नाचायला बोलावणे कितपत योग्य !
आमची माणसं आज चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे आपल्या महाराष्ट्र परंपरेला धरून नाहीत !
आयोजक यांनी चार वेळा विचार करून आमचं मराठी दैवत माँ जिजाऊ साहेब , सावत्रीबाई फुले , संत जनाबाई , माता अहिल्यादेवी यांचे ‘ प्रात्यक्षिक नाटके ‘ समाजासमोर उभी करावी.नाहीच जमलं तर बैठकीची लावणी ची आपल्या लेकरांना जाणीव करून द्यावी. नाशिक , पुणे सारख्या शहरात ३ ते ५ लाख जमा करणारी मीडिया समोर सर्रास खोटं बोलणारी गौतमी तू अगोदर शिकून घे मगच पैसे कमव कारण आमची मराठी प्रजा तुझ्याच मागे लागेल कारण जनतेला तुझी खऱ्या सोंगाची जाणीवच नाही झालेली. खर तर आता तूच शहानी हो मीडियाला सांगितले तसे लग्न करून घे आणि मराठी संस्कृती जर तुझ्याकडून जपणं होत असेल तर जप.कारण तुझ्या नाचण्याने कितीतरी घरे बेकार होणार यात शंका नाहीत वेगवेगळ्या गावात जाते चांगल्या संस्कृतीचा तू बिघाड करते … तुझ्या नाचण्याला कुणाचा विरोध नाहीत।परंतु तू आता हे थांबवले पाहिजे। किंबहुना जनतेने हे लक्षात घेणे गरजेचे आहेत
9422892198
COMMENTS