राज्यात शिवसेनेची जी गत झाली तीच राष्ट्रवादी काँगे्रसची देखील झाली आहे. एकीकडे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसला सहानुभूती आहे, तर दुसरीकडे शिं
राज्यात शिवसेनेची जी गत झाली तीच राष्ट्रवादी काँगे्रसची देखील झाली आहे. एकीकडे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसला सहानुभूती आहे, तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गट मात्र स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजप आपल्या जागा कायम राहाव्या यासाठी पक्षासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी धडपतांना दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय बाजारात जनतेच्या प्रश्नांचे काय ? असा सवाल उपस्थित न झाल्यास नवल वाटायला नको. सत्ता संघर्षाच्या राजकारणात सत्ता टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असले तरी, यामुळे सामान्य जनतेला वेटीस धरण्याचा प्रकार होत आहे. पुसेसावळी येथील दंगलीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत दौरा जाहीर न करता अचानक पुसेसावळी गावाला भेट देऊन पाहणी केली. दोन्ही घटनांमधून फडणवीस यांना त्यांचा नागपूर भाग प्यारा व अजित पवार यांना पश्चिम महाराष्ट्र प्यारा असा संदेश लोकांपर्यंत जावू लागला आहे. काल अचानक झालेल्या वळीवाच्या पावसामुळे नागपूर परिसरातील नागनदीला आलेल्या पूरामुळे सुमारे 10 हजार लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. या घटनेची पाहणी करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ गेले. तसेच नुकसानीच्या पंचनाम्यास दुपारपासून सुरुवात करुन तात्काळ मदत देण्याचे जाहीरही केले. नागनदीच्या परिसरात 109 मिमी पाऊस पडल्याने महापूर आला होता. लोकांचे नुकसान झाले मात्र नैसर्गिक आपत्तीला कसे तोंड द्यावे, याबाबत विचार करण्यापेक्षा अशा प्रकारे नुकसान होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ अशी घोषणा फडणवीस यांनी केली. आता सामान्य जनतेला प्रश्न पडतो की, नैसर्गिक आपत्तीवर राजकारणी कसे नियंत्रण ठेवणार? त्यापेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील जातीय दंगलीत मृत युवकाच्या नातेवाईकांना धीर देत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील आहेत, म्हणून काय सातारा जिल्ह्यात सर्वत्र चांगले वातावरण असेल असे काही नसते याचा विचार करून जातीय दंगलीमध्ये मुस्लिम समाज व हिंदूत्ववादी संघटना यांच्यातील संघर्ष संपवण्याची भावना राजकारण्यांमध्ये नसल्याचे दिसून आले. सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तर माध्यमांसमवेत चर्चा करण्यापेक्षा घरातून बाहेर न पडणे योग्य समजले. यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी माध्यमामार्फत शांततेचे आवाहन करणे गरजेचे होते. मात्र, सर्व काही धूरा प्रशासनाच्या हाती देऊन स्वत: मात्र नामानिराळे राहिल्याचे पहावयास मिळाले. यापूर्वी सातारा जिल्ह्याला हर्षवर्धन पाटील तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून उत्कृष्ट प्रकारे काम केले आहे. तसेच शिवसेनेकडे पालकमंत्री पद गेल्यानंतर विजय शिवतारे यांनी तर त्यांच्या मतदार संघातच सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या बैठकांचा फड रंगवला होता. शिवसेनेचेच मात्र, आता शिंदे गटात गेलेले ना. शंभूराज देसाई यांच्याच मतदार संघातील मदरसा प्रकरण हाताळताना मोरगिरी गावातील आपली मतपेटी आबाधित रहावी, म्हणून गप्प बसावे लागल्याचे ताजे उदाहरण होते. त्यातच खटाव तालुक्यातील पुसेसावळीतील जातीय दंगल हे त्यांना त्रास दायक ठरणारे वाटले, असावे. त्यासाठी कोणत्याही प्रसार माध्यमांमध्ये सत्ताधारी सरकारविरोधात उलट-सुलट वृत्त प्रसारित होवू नये. म्हणून 72 तासासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा बंद करून ठेवली होती. मात्र, त्यांनी असा विचार केला नाही की, पुसेसावळी हे गाव सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पुसेसावळी गावापासून चार किलोमीटर पलिकडे सर्व सेवा सुरुळीत होत्या. मात्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात काही घटना होवू नये म्हणून प्रशासनाने दक्षात घेतली. मात्र, जिल्ह्याबाहेरील घटनांचे काय? अशी अस्थिर स्थिती असताना प्रशासनाने इंटरनेट बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य कि आयोग्य याचा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जावून मागोवा घेतला नाही. यामुळे मुंबईमध्ये लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासारखे महाभयंकर प्रकरण असल्याचे भासवण्यात आले. त्यातून सामान्य जनतेला भीती दाखवून काय साध्य करावयाचे होते, हे लवकरच समोर येईल.
COMMENTS