Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुष्काळमुक्तीसाठी पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवणार ः मुख्यमंत्री शिंदे

काकडीमध्ये शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः गोदावरी खोर्‍याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍य

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य ः मुख्यमंत्री शिंदे
‘बार्टी’ च्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर ः मुख्यमंत्री शिंदे
ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे

अहमदनगर/प्रतिनिधी ः गोदावरी खोर्‍याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे  ’शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, आ.किरण लहामटे, आ.प्रा.राम शिंदे, आ.आशुतोष काळे, आ. सत्यजित तांबे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले आदी यावेळी उपस्थित होते.

’शासन आपल्या दारी’ अभियानात अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी 30 हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री शिदे म्हणाले, आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 1 कोटी 40 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना 3 हजार 982 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.  राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम  केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही ः उपमुख्यमंत्री फडणवीस – अहमदनगर जिल्ह्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 24 लाख लाभार्थ्यांपर्यंत शासन पोहचले असून 3 हजार 900 कोटी रुपयांचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाला आहे.  नमो शेतकरी सन्माननिधीत आता शेतकर्‍यांना वर्षाला 12 हजारांची मदत मिळत आहे. जिल्ह्यात फक्त एक रूपयात 12 लाख शेतकर्‍यांचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. राज्यात दुर्दैवाने दुष्काळा आला तर यावेळी सर्वच शेतकर्‍यांनी विमा उतरवलेला आहे. त्यामुळे सरकारची मदत , विम्याची मदत असेल या सगळ्या गोष्टी शेतकर्‍यांपर्यंत शासन पोहोचविणार असून सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

साखर कारखान्यांना शासनाच्या धोरणामुळे बळ ःउपमुख्यमंत्री पवार – राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे मिळाले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. असे ही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

लम्पी निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार ः पालकमंत्री विखे – एक रुपयात शेतकर्‍यांना विमा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, ही अभिमानाची बाब आहे. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत 170 कोटी रूपये खर्च केले आहेत. लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लम्पी आजारासाठी लागणार्‍या मदतीसाठी शासन सदैव शेतकर्‍यांशी पाठीशी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व हर घर जल  या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात येणार्‍या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले असून त्यांचे संगोपन करावे. असे आवाहन ही महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांनी केली हार्वेस्टिंग मशीनची पाहणी – जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः व्यासपीठावरून खाली येऊन शेतकर्‍यांना पॉवर टिलर व ट्रॅक्टर वाटप करण्यासाठी गेले. त्याठिकाणी त्यांना महाडीबीटी योजनेत एका लाभार्थ्यांला मिळालेले हार्वेस्टिंग मशीन दिसले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मशीनजवळ जाऊन मशीनची पाहणी केली व वैशिष्टये जाणून घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते.

COMMENTS