Homeताज्या बातम्यादेश

थेट एटीएम कार्डवर छापली लग्नपत्रिका

सध्या सगळीकडे लग्न कार्याची धुमधाम सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्न हा अविस्मरणीय क्षण असतो. त्यात लग्नातील प्रत्येक क्षण खास करण्यासाठी क

हिसाब तो लेकर रहेंगे, किरीट सोमय्या यांच अनिल परब यांना प्रत्युत्तर 
सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?
मुख्यमंत्री उद्धवजी, बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडांवर कारवाई कधी करणार ? lLokNews24

सध्या सगळीकडे लग्न कार्याची धुमधाम सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्न हा अविस्मरणीय क्षण असतो. त्यात लग्नातील प्रत्येक क्षण खास करण्यासाठी कुटुंबियापासून सर्वांची तारेवरची कसरत सुरु असते. प्रत्येक गोष्टीवर अफाट पैसा खर्च करत असतात. पण त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे लग्नपत्रिका… आपल लग्नातील लग्न पत्रिका सर्वांच्या लक्षात राहण्यासाठी काहीजण फक्त पत्रिकेवर भरपूर पैसा खर्च करतात. लग्नाच्या खरेदीची पहिली सुरूवात ही पत्रिका निवडण्यापासून होते. अशातच सध्या सोशल मीडियावर एका आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेचीच चर्चा सुरु आहे. तुम्ही म्हणाल नक्की काय वेगळे आहे..? तर लग्नासाठी छापली जाणारी लग्नपत्रिका चक्क एका एटीएम कार्ड वर छापली आहे. हे बघून तुम्ही ही म्हणाल लग्नपत्रिका आहे की एटीएम कार्ड..व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीच्या हातात खूपसारे आयताकार आकाराचे कार्ड दिसत आहेत. सुरूवातील आपल्याला असे वाटेल ते फक्त साधारण एटीएम कार्ड आहेत पण जर आपण बारकाईने बघितल्यावर समजते की ती चक्क एटीएम कार्डच्या रूपात लग्नपत्रिका आहे. या कार्डच्या एक साइटवर वेडिग इन्व्हिटेशनसोबत वधू- वरांची नावे आहेत तसंच लग्नाची तारीखही लिहिलेली आहे. तर दुसऱ्या साइटवर लग्नाचे ठिकाणासह इतरही माहिती छापण्यात आली आहे. ज्यासारखे एटीएम कार्डचवर लहान शब्दाने लिहिल असत त्याच प्रमाणे लग्नपत्रिकेवर सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. व्हायरल लग्न पत्रिकेचा व्हिडिओ @itsallaboutcardsया इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याच पेजवर अनेक प्रकारच्या लग्न पत्रितकेच्या डिसाईन आहेत. व्हायरल व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत. तसंच हा व्हिडिओ सर्व सोशल साईटवरही शेअर केला जातोय. व्हिडिओवर प्रतिक्रिया केलेल्या सर्वच नेटकऱ्यांना हे वेडिग इन्व्हिटेशन कार्ड आवडलेले आहे.

COMMENTS