Homeताज्या बातम्यादेश

गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला ः केंद्राच्या सूचना

देशात 24 तासामध्ये कोरोनाचे 341 नवे रुग्ण

नवी दिल्ली ः गेल्या दोन महिन्यानंतर देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. केरळमध्ये नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचब

कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलाय ‘गोदावरी’;
स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने राज्याची न भरून निघणारी  हानी –  खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
जिल्हा परिषदेत…बजाव ढोल ; वंचित बहुजन आघाडीने केले आंदोलन

नवी दिल्ली ः गेल्या दोन महिन्यानंतर देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. केरळमध्ये नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 341 नवे रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बुधवारी महत्वाची बैठक घेत गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याच्या सूचना केल्या आहेत.
देशात 341 नवे रुग्ण आढळून आले आहेत, विशेष म्हणजे यातील 292 प्रकरणे केरळमधील आहेत. हीच बाब लक्षात घेता आरोग्यमंत्री मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सर्व राज्यांचे आरोग्यामंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थिती होती. कोरोनाच्या नवा व्हेरियंट झपाट्याने पसरतोय त्यामुळे सर्व राज्यांनी सतर्क राहायला हवे, पण घाबरण्याची गरज नाही, मंत्री  मांडविया म्हणाले. बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना दर 3 महिन्यांनी एकदा सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क घालावा. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत केली जाईल, असे आश्‍वासनही मांडविया यांनी सर्व राज्यांना दिले आहेत. आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, ’आता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून एकमेकांसोबत काम करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी आपआपल्या राज्यातील रुग्णालयाची दर 3 महिन्यांनी आढावा घ्यावा. सणासुदीच्या काळात थंडीची परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात याव्यात. मांडविया यांनी देशातील सर्व नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन देखील केले आहेत. सणासुदीच्या काळात बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्कचा वापर करावा. घाबरण्याची गरज नाही, असंही मांडविया यांनी म्हटले आहे.

COMMENTS