Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर / प्रतिनिधी : शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच, असा विश्‍वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. हद

सैनिक स्कूलच्या नूतनीकरणाचे काम वेळेत गुणवत्तापूर्ण करावे : ना. बाळासाहेब पाटील
महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले
वैश्‍विक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी रयतमध्ये घडावा : आ. दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी : शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच, असा विश्‍वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. हद्दवाढ समन्वय सर्वपक्षीय कृती समितीशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हद्दवाढीसाठी शहराचे आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह हद्दवाढ कृती समितीने धरला.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, शहराचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर सत्तेत सहभाग पाहिजे. यामुळेच विधानसभेची निवडणूक लढवली आणि सर्वांच्या सहकार्याने आमदार झालो. यामुळे हद्दवाढ करणे माझी जबाबदारी आहे. हद्दवाढ करायचीच या अनुषंगाने प्रयत्नशील आहे. ज्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्वांच्या निदर्शनास आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करीत आहे. शहर आणि ग्रामीणमधील मतदारसंघात असतानाही मतदारसंघात विकास साधता येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ होय. यामुळे हद्दवाढीस विरोध करणार्‍या लोकप्रतिनिधींनी भीती मनात ठेवू नये कारण हद्दवाढीनंतर मतदार व मतदारसंघ कायम राहणार आहे.
आर. के. पोवार म्हणाले, हद्दवाढ आता नाही, तर कधीच नाही, अशी अवस्था होणार असल्याने हद्दवाढ काळाची गरज आहे. यामुळे हद्दवाढीसाठी आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा.
अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, “हद्दवाढीबाबत वाढीव गावासह फेरप्रस्ताव सादर करावा अशी भूमिका आमदार जाधव यांनी घेतली, याबद्दल समन्वय समितीच्या वतीने आमदार जाधव यांचे अभिनंदन. हद्दवाढीला विरोध करणार्‍यांची समजूत काढण्यासाठी गावोगावचा दौरा करून चर्चा करावी.
हद्दवाढीला अडथळा असलेले असक्षम प्राधिकरण रद्द करण्यासाठी शासनाला पत्र द्यावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी व्यक्त केली. बाबा पार्टे, अशोक भंडारे, सुनील देसाई, सुभाष जाधव, दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, संजय जाधव, कमलाकर जगदाळे, श्रीकांत माने, विवेक कोरडे, चंद्रकांत बराले, अशोक भंडारे, सुनील पाटील, दिलीप देसाई, विजय शिंदे, अनुप पाटील उपस्थित होते.

COMMENTS