Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजधानीतील मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकू

प्रकाशक परिषदेच्या भूमिकेने साहित्य संमेलन अडकले वादात

पुणे ः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा राजधानीत दिमाखात पार पडणार होते, मात्र त्यापूर्वीच हे संमेलन वादात सापडतांना दिसून येत आहे. या साहित

राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले – संजय राऊत
राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार ः मुख्यमंत्री शिंदे
चोरीस गेलेल्या दोन बुलेटसह सहा दुचाकी जप्त

पुणे ः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा राजधानीत दिमाखात पार पडणार होते, मात्र त्यापूर्वीच हे संमेलन वादात सापडतांना दिसून येत आहे. या साहित्य संमेलनावरुन  पुण्यातील प्रकाशक आणि प्रकाशक परिषद यांच्यात मात्र परस्पर विरोधी भूमिका दिसत आहे. इकतच नव्हे तर भूमिका मान्य नाही. इतकेच नव्हे तर प्रकाशक परिषदेकडून बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आला. त्यामुळे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वादाच्या भोवर्‍यात अडकले असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. प्रकाशक परिषद आणि प्रकाशक संघ यांच्यामध्ये ही परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळेल. मराठी साहित्य दिल्लीत पोहचेल आणि ते तिथे वाचले जाईल अशी भूमिका प्रकाशक परिषदेकडून घेण्यात आली. दुसरीकडे दिल्ली दूर असल्यामुळे प्रकाशकांचा खर्च वाढेल अशी भूमिका प्रकाशक संघाकडून घेण्यात आली.

प्रकाशक परिषदेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी यांनी यासंदर्भात भूमिका मांडतांना म्हटले आहे की, यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे, याचा आम्हाला आनंदच आहे. त्यामुळे प्रकाशकांनी यासाठी विरोध करु नये. साहित्य संमेलनामुळे दिल्लीत हे साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे साहित्य महामंडळाने ही जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे, तर ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू. दिल्लीतही मराठी लोकं आहेत. तेही या संमेलनासाठी येतील. फार पुस्तकांची विक्री नाही झाली तरी त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे प्रकाशकांनी नफा तोट्याचा विचार करुन नये, दिल्लीत जे काही होईल त्याचा नक्कीच फायदा होईल. प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी म्हटले की, नागपूरपासून बेळगांवपर्यंत आणि मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत प्रकाशकांचे आम्हाला फोन आणि मेसेज आले की, साहित्य महामंडळाने हा निर्णय चुकीचा घेतला आहे. हा निर्णय त्यांना बदलायला सांगा. तिथे साहित्य संमेलन घ्यायचे की नाही हा त्यांचा अधिकार आहे. पण मागील वर्षी हे साहित्य संमेलन अमळनेर झाले, त्याच्या आधी वर्ध्याला झाले. या दोन्ही संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री फार चांगली झाली नाही. पुढे त्यांनी म्हटले की, या दोन्ही साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री चांगली झाली नाही, याला कारणेही वेगळी होती, याबाबत कुणाचे दुमतही नव्हते. अमळनेरचे संमेलन झाले तेव्हा आम्ही निम्म भाडंही परत मागितले. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, पुढच्या संमेलनात तुमची कसर भरुन काढू. पण आता त्यांनी प्रकाशकांचा काहीही विचार न करता दिल्लीत संमेलन भरवले, असा आरोप बर्वे यांनी केला आहे.  

COMMENTS