वेगळा गट नसून आम्हीच शिवसेना :केसरकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेगळा गट नसून आम्हीच शिवसेना :केसरकर

कायदेशीर पेचामुळे भाजपची वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका

मुंबई/गुवाहाटी :राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असून, हे संकट अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांत राज्यात सत्ताबदल होतो की, नाही य

कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद
 अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३, आ. सुनील भुसारा यांची प्रतिक्रिया
बंद करा, बंद करा लोडशेडींग बंद करा ! | LOK News 24

मुंबई/गुवाहाटी :राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असून, हे संकट अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांत राज्यात सत्ताबदल होतो की, नाही याचे चित्र स्पष्ट होईल, असे बोलले जात होते. मात्र हे सत्तांतर आता लांबणीवर पडल्याचे दिसून येत असून, आता कोर्टाच्या निर्णयावर या सर्व प्रक्रियेची भिस्त राहणार आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वतंत्र गटाची नोंदणी करण्यासाठी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब’ नामकरण केले अशा बातम्या फिरत होत्या. मात्र त्या बातम्यांचे खंडन करून, आम्ही वेगळा गट नसून, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
सायंकाळी माध्यमांना संबोधित करतांना, केसरकर म्हणाले की, शिवसेनेला काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसने हॉयजॅक केला होता, आमच्या आमदारांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखत होती, त्यातून आम्ही आमच्या शिवसेनेची सुटका करत असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले. आमच्याकडे स्वतंत्र गट असून, त्या गटाला स्वतंत्र गटनेता निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.
फक्त आमदारच नव्हे तर, संघटना, पक्ष आणि चिन्ह देखील आपल्यासोबत जोडण्याचे काम शिंदे करताना पाहायला मिळत आहे. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे म्हणतायत की, खरी शिवसेना आमची आहे कारण हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारी सेना आमची आहे. महाविकास आघाडीत शिवसेना नेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी तडजोड केली म्हणून, आम्ही या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांच्या गटाला शिवसेना- बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोर एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर तिखट हल्ला चढवला. त्यांनी प्रामुख्याने बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंवर होणारी टीका फेटाळून लावत शिंदेंना त्यांचा मुलगाही खासदार असल्याची आठवण करवून दिली. उद्धव बंडखोरांना उद्देशून म्हणाले की- ’शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा. जे विठ्ठल व बडव्यांवर बोलत आहेत, त्यांचाच मुलगा खासदार आहे. हे ते विसरले आहेत का. मी लायक नसेल तर पद सोडायला तयार आहे. मात्र, राठोडांवर आरोप होऊन देखील मी संभाळले. तरी ते गेले. माझे मुख्यमंत्रिपद मान्य नसणे, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.’
शिवसेना बाळासाहेब असे गटाचे नाव ठेवले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचे अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेले नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. एकत्र निवडणुका लढवूनही आपण भाजपापासून दूर झालो, तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? पण तरी उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय मान्य केला. पण जेव्हा शिवसेनेचं अस्तित्वच संपवायला आपले मित्रपक्ष निघाले, तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही भूमिका मांडली आहे. ती उद्धव ठाकरेंना सातत्याने सांगितली आहे, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी बोलताना दिली आहे.

गटाला मान्यता मिळाल्यानंतर येणार नवे सरकार
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून आता शिवसेनेत बाळासाहेब गट आणि दुसरा (उद्धव) गट असे दोन गट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत यातून अधिकाधिक शिवसैनिक आपल्या गटाशी भावनिकरीत्या जोडले जातील, असा एकनाथ शिंदे गटाचा अंदाज आहे. तसेच एकनाथ शिंदे ही लढाई विधानसभा आणि कायदेशीररीत्या लढणार आहेत. या गटाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरच भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे सत्तांतराचा प्रयोग लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन करण्यासाठी 3 जुलैचा मुहूर्त ठेवण्यात आला असल्याच्या चर्चा देखील समोर येत आहे.

COMMENTS