गोरक्षनाथ गडावर ७ जूनला जलउत्सव व दररोजच्या महाप्रसादाचा प्रारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरक्षनाथ गडावर ७ जूनला जलउत्सव व दररोजच्या महाप्रसादाचा प्रारंभ

अहमदनगर : नगर नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर मंगळवार ७ जून २०२२ रोजी दरवर्षी प्रमाणे जलाभिषेक उत्सव  आयोजित करण्यात आला आहे यानिम्मिताने व

रेवणनाथ महाराज म्हणजे चिरंजीव ऊर्जा
पेट्रोल व डिझेल न देण्याच्या सक्त सूचना ; फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच मिळणार | ‘आपलं नगर’ | LokNews24
कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा : विवेक कोल्हे

अहमदनगर : नगर नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर मंगळवार ७ जून २०२२ रोजी दरवर्षी प्रमाणे जलाभिषेक उत्सव  आयोजित करण्यात आला आहे यानिम्मिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दररोजचा महाप्रसादचा प्रारंभ होणार आहे गेली २ वर्ष कोविडमुळे महाप्रसाद बंद होता व २ वर्ष जलउत्सव पण झाला नाही त्यामुळे यावेळेस हजारोच्या संख्नेने भाविक कार्यक्रमाला येतील असा अंदाज आहे.

               दरवर्षी दि ७ जूनला मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर संपूर्ण मंदिर व परिसर स्वच्छ करून जलाभिषेक,पाण्याने धुऊन काढले जाते व मंदीरात मूर्तीला रुद्राभिषेक विश्वस्त मंडळ व गावकरी यांच्या हस्ते केला जातो त्याचा प्रारंभ सकाळी ९ वा होणार आहे यावेळी हजारो भाविक उपस्थित राहणार असून देवाला जल अर्पण करून ओम शिव गोरक्ष,हर हर महादेव चा जयघोषने परिसर दुमदुमून जातो. नंतर श्री अभिषेक,पूजा व महाआरती,भजने,किर्तन नाथभक्त म्हणतात गेली २ वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गोरक्षनाथ गडावर बंद असलेला दररोजचा महाप्रसादचा प्रारंभ दुपारी १२ वा होणार आहे. त्यासाठी राकेश कुमार(ऑस्ट्रेलिया) यांनी अंदाजे दीड लाख रु चा १ टन बासमती तांदूळ दिला आहे,गेली अनेक वर्षे देवस्थान व भाविकांच्या सहकार्याने येणाऱ्या भाविकांना दररोज महाप्रसाद दिला जातो त्याचा प्रारंभ होणार आहे,ज्यांना यासाठी मदत करावयाची आहे त्यांनी देवस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष ऍड शंकरराव कदम व कार्यकारी मंडळाने केले आहे. सध्या असणाऱ्या सुट्ट्यामुळे भाविक व पर्यटक रोज गर्दी करत आहे. नवनाथ भक्तिसार मध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे स्त्री राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथानी सोन्याची वीट बरोबर आणली होती ती मांजरसुंभा या ठिकाणी ऋषी,मुनी,देव आदिसाठी भंडारा करण्यासाठी ती गोरक्ष नाथानी फेकून दिली तेव्हा मच्छिंद्रनाथाचा राग अनावर होऊन त्यांनी तांडव केले. गुरूला शांत करण्यासाठी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला व गुरूची इच्छापूर्ती साठी सर्वाना निमंत्रण देऊनया ठिकाणी संपूर्ण श्रावण महिन्यात महायन्य केला करून अन्नदान केले अशी पौराणिक कथा आहे म्हणून लोक या ठिकाणी लोक १२ महिने दर्शनाला येत असतातव येथे अन्नदान केले जाते. 

COMMENTS