Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनागव सोसायटीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पॅनेलचा धुव्वा

कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील सोनागव विकास सोसायटीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले याचे समर्थक जयदीप शिंदे यांच्या

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन
कराड शहरातील थकबाकीदार आता झळकणार फ्लेक्सवर
पाटण तालुक्यात काँगे्रस शून्यातून विश्‍व निर्माण करणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील सोनागव विकास सोसायटीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले याचे समर्थक जयदीप शिंदे यांच्या अजिंक्य सहकार पॅनेलने 13 विरुध्द 0 असा निर्विवाद विजय मिळवला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर शिंदे यांच्या पिंपळेश्‍वर वाकडेश्‍वर पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला.
आ. भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयदीप शिंदे यांच्या गटाविरुध्द मयूर शिंदे गटाने पिंपळेश्‍वर वाकडेश्‍वर परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अजिंक्य सहकार पॅनेलने वर्चस्व सिध्द केले.
सोसायटीच्या निवडणूकीत अजिंक्य सहकार पॅनेलनच्या जगन्नाथ चिकणे, रामदास दुदुस्कर, विजय दुदुस्कर, अमित शिंदे, जयदीप शिंदे, नारायण शिंदे, रामदास शिंदे, सुरेश शिंदे, कुसूम चिकणे, लीलावती चिकणे, दत्तात्रय पालकर, अशोक रोकडे, कविता जाधव आदी उमेदवार विजयी झाले. मतमोजणीनंतर जयदीप शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत गावातून विजयी मिरवणूक काढली. यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, समीर आतार, सागर धनावडे याच्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
8-8
सोनागव : विकास सोसायटीतील अजिंक्य सहकार पॅनेलनच्या विजयी उमेदवार आनंदोत्सव साजरा करताना.

COMMENTS