नाशिक – वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड ही खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील आघाडीची कंपनी वर्ल्ड फुड इंडिया २०२३ मध्ये लक्षणीय स्तरावर
नाशिक – वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड ही खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील आघाडीची कंपनी वर्ल्ड फुड इंडिया २०२३ मध्ये लक्षणीय स्तरावर सहभागी होत आहे. हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी प्रगती मैदान, दिल्ली येथे सुरू होणार असून ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. कंपनी आपली उत्पादने हॉल ५ – ई१४ येथे मांडणार आहे.
वर्ल्ड फुड इंडिया २०२३ हा भारतीय खाद्यपदार्थ अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा कार्यक्रम असून त्यामुळे भारतीय आणि परकीय गुंतवणुकदारांमध्ये भागिदारीसाठी वाव मिळतो. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने आपल्या विस्तृत उत्पादन श्रेणीसाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड नावांचे वर्गीकरण करून आपल्या उत्पादन धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. या घोषणेनुसार सर्व रिटेल उत्पादनांनावर ‘क्विकशेफ’ हे ब्रँड नाव अभिमानाने झळकेल, तर होरेका (हॉटेल, रेस्टरंट आणि केटरिंग) श्रेणी ‘स्नॅक बडी’ या बॅनरअंतर्गत चमकेल.
वर्ल्ड फुड इंडिया २०२३ मधील कंपनीचा सहभाग आपल्या वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला असामान्य खाद्यानुभूती देण्याची आणि ब्रँडिंगसाठी प्रगतीशील दृष्टीकोन अवलंबण्याची कंपनीची बांधिलकी दर्शवणारा आहे. कंपनी बीटुबी आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्हिजिटर्सचे आपली सर्वसमावेशक उत्पादन श्रेणी अनुभवण्यासाठी स्वागत करत आहे. तज्ज्ञ व्यावसायिकांनी तयार केलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांची चव व्हिजिटर्सनी घ्यावी यासाठी कंपनीने सुसज्ज स्वयंपाकघर तयार केले आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव आपली उत्सुकता व्यक्त करत म्हणाल्या, ‘वर्ल्ड फुड इंडिया २०२३ चा एक भाग होताना आणि आमची नव्याने तयार करण्यात आलेले उत्पादन वर्गीकरणाचे धोरण सादर करताना आनंद होत आहे. आमचे रिटेल आणि होरेका उत्पादन श्रेणी वेगवेगळी सादर करून ग्राहकांना जास्त सुस्पष्टता आणि सुयोग्य अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचे आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याची बांधिलकी दर्शवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
या एक्स्पोमध्ये वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड क्विकशेफ रिटेल श्रेणी अभिमानाने सादर करणार असून या श्रेणीत विविध प्रकारची उत्पादने समाविष्ट आहेत. त्यात रेडी-टु-ईट (आरटीई) मील्स, फ्रोजन उत्पादने, मसाले आणि सॉसचे स्वादिष्ट प्रकार यांचा समावेश असेल. त्याशिवाय स्नॅक बडी होरेका श्रेणीसुद्धा प्रामुख्याने मांडली जाणार असून त्यामुळे कार्यक्रमाची व खाद्यपदार्थांची रंगत वाढेल.
कंपनीने मसाल्यांची नवी श्रेणी लाँच करत नुकतीच आपली उत्पादन श्रेणी विस्तारली. नवरात्रीच्या उत्सवाची योग्य वेळ साधत ही श्रेणी लाँच केली होती. खाद्यपदार्थ व्यावसायिक तसेच घरगुती शेफ्स यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा आणि चवीची आवड पूर्ण करण्यासाठी ही श्रेणी खास तयार करण्यात आली आहे. या विस्ताराच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करण्याची आणि खाद्यअनुभूती उंचावण्याची कंपनीची दृढ बांधिलकी परत दिसून आली आहे.
COMMENTS