हिमायतनगर प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव म्हणून मौजे वारंगटाकळी म्हणून सुप्रसिद्ध आहे. या वारंगटाकळी गाव विदर्भातुन ते मरा
हिमायतनगर प्रतिनिधी – हिमायतनगर तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव म्हणून मौजे वारंगटाकळी म्हणून सुप्रसिद्ध आहे. या वारंगटाकळी गाव विदर्भातुन ते मराठवाड्याकडे येण्यासाठी महत्वाचा रस्ता आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागाला जोडणार्या रस्त्यामुळे या परिसरातील उद्योगधंदे व अन्य विकासाला चालना मिळणार .या रस्त्यावर बंधारा पासून पुढे मौजे मंगरुळ गावाकडे असे एकूण तीन किमी रस्त्याचे मजबुतीकरण्या सह डांबरीकरणाचे काम मंजुर झालेले आहे. या रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी मोठ्या कष्टाने निधी खेचून आणला आहे. कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त करुन नामवंत शासकीय गुत्तेदार यांनी हे काम इमानदारीने प्राप्त करून घेतले असून,या डांबरीकरणाचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असून,याकडे उपविभागीयअभियंता तुंगेनवार तसेच शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय हिमायतनगर यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.या डांबरीकरण कामाची तोंडी व लेखी तक्रारी मौजे वारंगटाकळी येथील गावकर्यांनी संबंधित उपविभागीय अभियंता यांना अनेक वेळा सांगून ही काहीचं फरक पडला नाही.या कामात कसल्याही प्रकारची सुधारणा न होता अतिशय निकृष्ट दर्जाचं रॉ मटेरियलचा वापर करुन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम यावेळी केले जात आहे.कामाची संबंधित अभियंत्यास वारंवार सूचना व लेखी,तोंडी तक्रार देऊनही संबंधित कामाचा दर्जा सुधारत नसल्याने अभियंत्यास व संबंधित गुत्तेदारास या कामाच्या विषयी मुकंसहमती असल्याने शासनाकडून आलेला निधी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाया जात असल्याची प्रतिक्रिया मौजे वारंगटाकळी येथील गावकर्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंगटाकळी पासून ते पैनगंगा नदीच्या बंधार्यापर्यंत हा रस्ता विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एकमेव जोडणारा मार्ग म्हणून महत्त्वाचा आहे.हा रस्ता दुरावस्थेमुळे अडगळीला पडलेला होता.परंतु शासनाकडून लाखो रुपयांच्या निधी या रस्त्यावर मंजूर होतांच या कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त करून गेल्या महिन्यातचं या कामास सुरुवात झालेली होती.परंतु या कामावर अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याचे खोदकाम न करता अतिशय थातुर -माथुर पद्धतीने कमी-अधिक प्रमाणात गिट्टीचा व कमी मुरमाचा थर टाकून,त्यावर दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी पाणी न टाकता,यावर ओबडधोबड साईड लेवलींग न करता अतिशयअल्प प्रमाणात डांबर टाकुन, डांबरांची जाडी कमी प्रमाणात,उंची,रुंदीसह उर्वरित रस्त्यांचे कामे घाई गडबडीत उरकून लाखो रुपयांची बिले संबंधित गुत्तेदारास दिले जाण्याचे काम अभियंते करितअसल्याचा आरोप सुद्धा गावकर्यांकडून होत आहे.या कामाची गुणनियंत्रण व दक्षता पथक विभाग, सार्वजनिक बांधकाम नांदेड मंडळ नांदेड कडून चौकशी झाल्या शिवाय संबंधित गुत्तेदारास पुढील उर्वरित बिले देण्यात येऊ नये,अशी लेखी मागणी रामचंद्र चिंतलवाड,सरपंच गिरी महाराज यांच्यासहअनेकांनी केली असल्याचे सांगितले आहे.
COMMENTS