Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर शहरातून आरोग्य दिनानिमित्त वॉकेथॉन रॅली

श्रीरामपूर ः जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन, श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूर मर्चेंट असोसिए

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या निर्णयाविरोधात आ. राधाकृष्ण विखे करणार आंदोलन | LOK News24
कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
खा. नीलेश लंके यांचा राजधानीत चक्क रिक्षातून प्रवास

श्रीरामपूर ः जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन, श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूर मर्चेंट असोसिएशन व माधवबाग क्लिनिक श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी,  सकाळी 7 वाजता श्रीरामपूर शहरातून वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आपले आरोग्य उत्तम रहावे, याकरिता दररोज सकाळी रिकाम्या पोटी चालणे हा सर्वात सोपा आणि अतिशय परिणामकारक व्यायाम आहे. त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी खूप मदत होते. चालण्याच्या व्यायामाविषयी जागृती निर्माण करण्याकरिता या रॅलीचे आयोजित करण्यात आले होते. या रॅलीमध्ये चालण्याचे महत्व सांगणार्‍या विविध बॅनरने लक्ष वेधून घेतले होते. रैलीमध्ये माहेश्वरी समाज, चैतन्य योग प्रतिष्ठान, कीप फिट हेल्थ क्लब,  श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन, किसान कनेक्ट, सितारों की दुनिया,  इंडियन डेंटल असोसिएशन श्रीरामपूर, हरियाली मंच, अ.नगर जिल्हा स्वास्थ्य समिती, इनरव्हील क्लब ऑफ श्रीरामपूर सहभागी झाले होते.

COMMENTS