वडगाव शेरी येथील भुयारी गटाराचे काम जलद गतीने करणार : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडगाव शेरी येथील भुयारी गटाराचे काम जलद गतीने करणार : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 28 : पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी भागातील लक्ष्मी नगर आणि कामराज नगर भागातील भुयारी गटाराचे काम जलद गतीने करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

आरक्षणाच्या नावाने पोकळ बैठकांचे सत्र
नारायणी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
निकालानंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार

मुंबई दि. 28 : पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी भागातील लक्ष्मी नगर आणि कामराज नगर भागातील भुयारी गटाराचे काम जलद गतीने करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातील तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य सुनील टिंगरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, येरवडा येथील लक्ष्मीनगर आणि कामराज नगर हा दाट लोकसंख्येचा परिसर असून या भागात सकाळी पाण्याचा वापर विविध कारणांकरिता मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे ड्रेनेजची वहन क्षमता अपुरी पडते. या कारणामुळे सकाळच्या वेळी ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होतो. त्यामुळेच येथील मल:निसारण नलिकेचा व्यास 12 इंचाचा असून तो 18 इंचाचा करण्याबाबत नियोजन करण्यात येत असून यासाठी 20 लाख रुपयांचा निधी पुणे महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम लवकरच पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

COMMENTS