निघोज ः पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर निळोबाचे येथील हभप माऊली महाराज खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकूळ, वृंदावन, मथुरा, नंदगाव बरसा

निघोज ः पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर निळोबाचे येथील हभप माऊली महाराज खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकूळ, वृंदावन, मथुरा, नंदगाव बरसाना येथील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी 15 भाविक गेले होते. त्यावेळी हभप माऊली महाराज खामकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. व त्यानंतर निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन कै. श्री ज्ञानदेव माऊली पठारे पाटील वडुले यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश पठारे पाटील व पठारे पाटील परीवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. या यात्रेमध्ये श्री संभाजी शिंदेसर व सौरोहिणी शिंदे राळेगण थेरपाळ, कवठे गांजेवाडी येथील श्रीगणेश पवार, भरत गायकवाड, विष्णु शिंदे, गोरक्ष शिंदे, दत्तात्रय शिंदे, बाळकृष्ण सावंत यांनी ही अन्नदान देऊन वारकर्यांची मन तृप्त केली. व यात्रेतील सर्वच भाविकांनी यथाशक्ती मदत केली. यावेळी संत निळोबाराय सेवाभावी यात्रेतील सर्व वारकरी उपस्थित होते.
COMMENTS