Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदानास सुरवात 

सोलापूर प्रतिनिधी - अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीस

मारुती महाराज कारखान्याने दिला 2555 रुपये भाव
जालना जिल्ह्यात एसटीचा मोठा अपघात
धुळ्यातून बनावट रासायनिक खते जप्त

सोलापूर प्रतिनिधी – अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी 1668 मतदार असून पाच मतदान केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या बाजार समितीसाठी 78 गावांचा समावेश आहे. सहकारी संस्था 748 तर ग्रामपंचायतीत 707, व्यापारी 138, हमाल तोलार 69 असे 1 हजार 668 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत.

        मागील निवडणुकीत काँग्रेस च्या मदतीने बिनविरोध च्या माध्यमातून  भाजप ने बाजार समितीवर ताबा मिळवला होता.मात्र चालू वर्षी आरोप प्रत्यारोपण राजकारण करत काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात भाजप चे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार सिद्रामअप्पा पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस च्या मदतीने बिनविरोध च्या माध्यमातून भाजप ने बाजार समितीवर ताबा मिळवला होता. मात्र चालू वर्षी आरोप प्रत्यारोपण राजकारण करत काँग्रेस आणि भाजप एकमेकांना विरोधात पुन्हा मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

          भाजपचे दोन्ही आमदार एकत्रित येऊन निवडणूक लढवत असले तरी भाजपातील काही नेते हे काँग्रेस च्या बाजार समिती बचाव पॅनल मध्ये सहभागी झाले आहे. यावर जोरदार आक्षेप घेत पैशाचा हव्यासापोटी गोल्डन गॅंग ही विरोधी पक्षाला मिळाल्याचा आरोप माजी आमदारांनी केला.

             बाजार समितीमध्ये विकासा ऐवजी वैयक्तिक द्वेषाचे राजकारण आल्याचा आरोप करत अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसने सर्व पक्ष संघटनाच्या एकीची वज्रमुठ बांधली आहे. भाजप आणि काँग्रेस आघाडी पैकी मतदार आता कुणाला देणार हे 30 तारखेला समजेल.

COMMENTS