बीड प्रतिनिधी - नवगण राजुरी सर्कल मध्ये मला बरोबरीने मतदान झाले आहे मतदारांचा मूड बदलला आहे. बदल ही काळाची गरज असून यापुढे मतदारच बदल घडून आणतील
बीड प्रतिनिधी – नवगण राजुरी सर्कल मध्ये मला बरोबरीने मतदान झाले आहे मतदारांचा मूड बदलला आहे. बदल ही काळाची गरज असून यापुढे मतदारच बदल घडून आणतील असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बीडच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवगण राजुरी सर्कलमध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, प्रा.जगदीश काळे, डॉ.योगेश क्षीरसागर, विलास बडगेल नितीन लोढा, सखाराम मस्के, अॅड.राजेंद्र राऊत, अरुण डाके, गणपत डोईफोडे, बाजीराव बोबडे,दिलीप आहेर, सचिन घोडके, अरुण शेळके, गोरख दन्ने, गणेश राऊत, अच्युत मोरे, दत्तात्रय नाईकवाडे, राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर व उमेदवार उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक प्रा.जगदीश काळे यांनी केले तर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी लेखाजोखा मांडताना राजुरीचा इतिहास सांगायची गरज नाही.स्व.काकू-नाना यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून या सर्कलला प्राधान्य दिले आहे.पण सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे.या सर्कल मधून शेकडो कुटुंबांना आधार देऊन स्व. काकू आणि नानांनी दिलासा दिला आहे. आजच्या स्थितीत मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे जी परिस्थिती आणि गोंधळ जनतेसमोर आला आहे त्यामुळे बदनामी शिवाय दुसरं काहीही मिळालेले नाही केवळ विरोध म्हणून 17 पक्ष एकत्र करत ताकद लावली जात आहे पण येत्या 29 तारखेला कळेल खरी ताकद कुणाची, अण्णांनी जे केले ते जनतेच्या भल्यासाठीच म्हणूनच मतदार अण्णांच्या पाठीशी उभे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी गंगाधर घुमरे यांनी घनाघात करत आमदारांच्या सर्व कुरापती बाहेर काढल्या, जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही तो माय-बाप जनतेचा होऊ शकेल काय? असा प्रश्न उपस्थित करत ज्यांच्या अंगी संस्कारच नाही त्यांना आपण पाठबळ देणार का? असा सवाल केला.बीड जिल्ह्यात दूरदृष्टी असणारे नेते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या जयदत्त अण्णांनी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना पाठबळ दिले आहे भविष्यात हे सर्वच उमेदवार केवळ शेतकर्यांच्या भल्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आज शुभ मुहूर्त आहे, ईद, परशुराम जयंती, श्री बसवेश्वर जयंती आणि अक्षय तृतीया असा चौरंगी योग आला आहे नवगण राजुरी सर्कलचा मूड आता बदलला आहे. मला बरोबरीने मतदारांनी मतदान केले आहे या सर्कल मध्ये आता बदल ही काळाची गरज असून मतदाराच तो बदल घडून आणतील यापूर्वीचा मागावा घेतला तर या सर्कल मध्ये कोणते मोठे प्रकल्प आले? कोणती मोठे कामे झाली? याचा अभ्यास करूनच मतदारांनी आता विचार करण्याची गरज आहे, सत्ता ही लोकांसाठी असते केवळ चौकाशा लावा, तक्रारी करा प्रश्न उपस्थित करा, कामे आडवा, यासाठी सत्तेचा उपयोग केल्यास जनता कधीही माफ करत नाही कोणतेही प्रकल्प हे दीर्घकालीन टिकणारे असावे लागतात राजुरी आणि परिसरात जवळच असलेल्या श्री क्षेत्र नगदनारायण गडाच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी आपण केली आहे.गहिनीनाथ गडाप्रमाणेच नारायण गडाचा ही विकास व्हावा ही सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नवगण राजुरी सर्कल मधील सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS