Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍लक्ष्मी प्रतिष्ठान सत्कार्याला बळ देणारे प्रतिष्ठान

डॉ. विकास आमटे ः राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

श्रीरामपूर ः सुखदेव सुकळे हे अनेक वर्षापासून आनंदवन सेवाकार्याशी एकरूप आहेत. त्यांनी विविध सेवाभावी व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन जो सन्मा

आदिवासी समाजासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी मिळावी
LOK News 24 । वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी- प्रकाश आंबेडकर
शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द

श्रीरामपूर ः सुखदेव सुकळे हे अनेक वर्षापासून आनंदवन सेवाकार्याशी एकरूप आहेत. त्यांनी विविध सेवाभावी व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन जो सन्मान केला, ते प्रेरणादायी असून त्यांचे प्रतिष्ठान हे सत्कार्याला बळ देणारे प्रेरणा प्रतिष्ठान असल्याचे मत आनंदवन महारोगी सेवा समिती सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.
   श्रीरामपूर येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आनंदवन येथील सुधाकर कडू यांना स्व. अड् रावसाहेब शिंदे स्मृती शिक्षण राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि अशोकराव बोलगुंडेवार यांना स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करताना सोहळ्याचे प्रमुन पाहुणे म्हणून वरोरा आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. भारतीताई आमटे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव विश्‍वनाथ सुकळे होते. त्यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. प्रमुख पाहुणे डॉ. विकास आमटे यांनी श्रीरामपूरच्या आनंदवन पॅटर्न, रावसाहेब शिंदे यांच्या आठवणी सांगून रावसाहेबाचे सेवाकार्य सुखदेव सुकळेसर पुढे नेत आहेत. हे विशेष कौतुकास्पद असून सुधाकर कडू आणि अशोकराव बोलगुंडेवार यांना रावसाहब शिंदे नावाचा पुरस्कार लाभला याविषयी आनंद व्यक्त केला. प्रतिष्ठनचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, उपाध्यक्ष, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, कोषाध्यक्ष सुयोग बुरकुले आदी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चांगले सत्कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पुरस्कार्थीचे सत्कार करून अभिनंदन केले. डॉ विकासभाऊ आमटे यांनी सेवाभावी कार्याबद्दल सुखदेव सुकळे यांचा सत्कार केला. सुधाकर कडू आणि अशोकराव बोलगुंडेवार यांनी पुरस्कार दिल्याबद्दल सुखदेव सुकळे, पदाधिकारी यांचे आभार मानले. उपस्थित मान्यवरानी, पुररकार्थांविषयी मनोगत व्यक्त केले. आनंदवनचे राजेश ताजणे कार्यक्रम संयोजन केले. सुरेखा संजय बुरकुले, शीतल संकेत, सुयोग बुरकुले यांनी नियोजनात भाग घेतला. कार्यक्रमास डॉ. प्रविण मुधोळकर, डॉ. विजय पोळ, राजेश ताजणे, सदाशिव ताजणे, माधव कवीश्‍वर हे विश्‍वस्त, ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थोटे, डॉ. यशवंत घुमे, धन राज आस्वले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रविण मुधोळकर यांनी केले तर राजेश ताजणे यांनी आभार मानले.

COMMENTS