Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल 

नंदुरबार - नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेत

जिल्ह्यातील रस्ते 1 मेपर्यंत अतिक्रमणमुक्त होणार
मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत
पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक

नंदुरबार – नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी कांदा शेतकरी साठवून ठेवत होते. यामुळे कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असायचा, परंतु यावेळी अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होईल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा साठवला नाही व तो मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला आहे. यामुळे अचानक मार्केटमध्ये आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील वर्षी कांद्याचे दर 12 ते 15 रु. किलो मिळत असल्याने शेतकरी आनंदी होता. परंतु यावर्षी कांद्याचे दर 2 ते 3 रुपये प्रति किलो मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे व भाड्याचे देखील पैसे निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा खराब झाल्याने फेकण्यात येईल त्यामुळे मिळेल त्या दरात शेतकरी कांदा विकत आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात बसला आहे हे दिसून येते म्हणून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

COMMENTS