नाशिक प्रतिनिधी :- शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था scert आणि बालभारती यांच्या वतीने राज्यातील शिक्
नाशिक प्रतिनिधी :- शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था scert आणि बालभारती यांच्या वतीने राज्यातील शिक्षणाला दिशादर्शक प्रकल्प येत्या मे महिन्यात प्रारंभ होत आहे.virtual classroom in maharashtra व्हर्चुअल क्लास ही संकल्पना राबविली जाणार आहे.
काय आहे व्हर्चुअल क्लासरूम ?
राज्यातील 761 शाळा यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही जिल्हा परिषद शाळांची आहे. या संकल्पनेत कोरोना काळात ज्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. त्या पद्धतीने आता या शाळांमध्ये संच बसविण्यात आले असून त्याद्वारे दिवसभरातील काही तासिका या माध्यमातून दाखविल्या जाणार आहेत. त्यासाठी शाळांमध्ये स्क्रीन,विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठीची यंत्रणा बसविण्यात आली आहे . त्यासाठी शासनामार्फत खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून हे सर्व तयार करण्यात आले आहे.
शिक्षणामध्ये थेट शाळेत न जाता virtual classroom च्या माध्यमातून शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना मध्ये सरकारला याची गरज जाणवली त्यातून ही संकल्पना पुढे आली आहे.
online virtual classroom साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने राज्यातील शिक्षकांना याचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच त्यांच्या साठी वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. आगामी वर्षासाठी हे वेळापत्रक कार्यान्वित असणार आहे.
यंदा मे महिन्यामध्ये या virtual class वर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून इयत्ता दहावी साठी उन्हाळी वर्ग राबवला जाणार आहे.
यासाठी पुणे येथील ई बालभारती विभागात तीन स्टुडीओ उभारण्यात आले आहेत. या तीन स्टुडीओ मधून इयत्ता 1 ते 10 पर्यंतचे वर्ग चालणार आहेत. शिक्षक या स्टुडीओ मधून शिकविणार आहे. त्यासाठी त्यांना आधुनिक white board आणि interactive board च्या माध्यमातून power point presentation दाखविले जाईल. हे सर्व शिकवीत असताना त्या दूरस्थ शाळेवरील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
यासंदर्भात बालभारती येथे गेल्या 10 एप्रिल पासून या व्हरच्युअल तासिका घेणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण आणि डेमो दिले जात आहेत. तसेच त्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी ई बालभारती येथे तीन स्टुडिओ उभारण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था,समग्र शिक्षा अभियान , शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे advantages of virtual classroom फायदे दिसणार आहेत .
आभासी प्रयोगशाळा (Virtual Lab) प्रकल्प सन २०२३ २४ साठी प्रकल्पातील यंत्रणेची देखभाल व कार्यान्विती करण्याची जबाबदारी मंडळाची असून त्याचा प्रत्यक्ष वापर (शिक्षकांमार्फत तासिकांचे नियोजन करणे व ७६१ शाळांना ०४ स्टुडिओच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देणे) ही जबाबदारी •पुण्यातील SCERT संस्थेकडे देण्यात आलेली आहे,ऑनलाईन शिक्षणाचा सुटीतही अध्ययनाला लाभ घेता येईल व त्याचा लाभ महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या विद्यार्थी यांना होणार आहे.
नुकताच राज्यातील तज्ज्ञ शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते. येथे व्हर्च्युल क्लासरूम कार्यशाळा १० ते २९ एप्रिल २०२३ दरम्यान बालभारती कार्यालय, शिवाजी नगर, पुणे येथे कार्यशाळेचे आयोजन करून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम अडसुळ,नारायण मंगलाराम,गुलाब दातीर, शशिकांत कुलथे,संजय खाडे,योगेश सोनवणे अशा विविध तज्ज्ञांमार्फत इयत्ता १ ली ते १० वी साठी वार्षिक वेळापत्रक निर्मिती इयत्ता/विषय घटकवार करण्यात आले आणि २ मे पासून याचा लाभ विद्यार्थी शिक्षक तथा पालकांसह शिक्षण प्रेमी घेत आहेत.हा प्रत्यय जागोजागी येतो आहे.
यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता १० वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व सराव करून परीक्षेत यश मिळविणेसाठी उन्हाळी विशेष तासिका मार्गदर्शन दिनांक ०२ मे ते १० जून २०२३ दरम्यान बालभारती कार्यालय, शिवाजी नगर, पुणे येथून अनुभवी व विषयातील तज्ज्ञांमार्फत ऑनलाईन स्वरुपात करणेत येत आहे,अशी माहिती उपसंचालक डाॅ नेहा बेलसरे यांनी दिली.
व्हर्च्युल क्लासरूम ची काही ठळक वैशिष्ट्ये =
१. उपक्रम- आभासी प्रयोगशाळा (Virtual Lab) उन्हाळी सुट्टी शिबिर अध्यापन तासिका आयोजन
२. कालावधी- दिनांक ०२ मे ते १० जून २०२३
३. वेळ सकाळी ८.०० वा. ते ११.०० दरम्यान
४. स्वरूप- आभासी प्रयोगशाळा (Virtual Lab) उपलब्ध असलेल्या इयत्ता १० वी च्या शाळांसाठी स्वरुपात सर्व शालेय विषयाचे अध्यापन मार्गदर्शन, प्रश्न-उत्तरे स्वरुपात. ऑनलाईन
५. अपेक्षित लाभार्थी आभासी प्रयोगशाळा (Virtual Lab) उपलब्ध असलेल्या इयत्ता १० वी चे वर्गाचे शिक्षक व विद्यार्थी
६. घटक- सर्व शालेय विषयांसाठी उपयुक्त घटक
यासाठी शाळांनी योग्य नियोजन केले असून आपल्या कार्यक्षेत्रातील आभासी प्रयोगशाळा (Virtual Lab) व उपलब्ध असलेल्या इयत्ता १० वी चे वर्ग याचा प्रत्यक्ष लाभ घेत आहेत.
डाॅ प्रसादशास्त्री कुळकर्णी यांची संस्कृत विषयाकरिता निवड – शहरातील सुप्रसिद्ध स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे कार्यरत संस्कृत अध्यापक व संस्कृत विभाग प्रमुख पं डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांची संस्कृत विषयाकरिता आठवी ते दहावीकरिता एससीईआरटी तर्फे आयोजित आभासी अध्यापन उपक्रमात अध्यापन करण्यासाठी निवड झाली आहे. या संस्कृत समितीत डाॅ प्रज्ञा देशपांडे,शितल भेंडारकर,अश्विनी पिंपळापुरे,वैदेही केळकर (नागपूर)डाॅ अजय निलंगेकर, सीमा निलंगेकर(छत्रपती संभाजीनगर) प्राची कुंटे(सोलापूर)कांचन जोशी(मुंबई)गिरीश जोशी,मुग्धा समदेकर (पुणे)यांचाही समावेश आहे.
COMMENTS