Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित

पालकमंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

बीड ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सर्वप्रथम बीडमध्ये पेटला होता. आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके यांचे घर पेटवून दिले होते. या हिंसाचारानंतर पा

 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करणार
ब्रम्हवाडी गावात विकासाची गंगा – धनंजय मुंडे

बीड ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सर्वप्रथम बीडमध्ये पेटला होता. आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके यांचे घर पेटवून दिले होते. या हिंसाचारानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप करत, हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. या हिंसाचारामागे मोठे षडयंत्र असून, हिंसाचाराच्या घटना या ठरवून केलेल्या असून याचा मी निषेध करतो. या प्रकरणाची एसआयटी मार्फत तपास करावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
आजपर्यंत कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनात कोणाची घरे जाळण्याचे प्रकार झाले नाहीत, देशाला स्वातंत्र्य मिळताना ब्रिटिशांनीसुद्धा लोकांची घरे जाळली नाहीत. असे म्हणत हे ठरवून केलेले कारस्थान असून यासंबंधीत कडक कारवाई करण्याची बीडकरांची मागणी आहे.. असे धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादी भवन जाळले, क्षीरसागर यांचे घर आणि ऑफीस जाळले. सुभाष राऊत यांचे संपूर्ण हॉटेल जाळले, भाजप शिवसेनाचे कार्यालय फोडले. हा सर्व हिंसाचार एक एक व्यक्ती पाहून केला असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणासाठी मी 1998 पासून काम करत आहे. कृपया भावना भडकवणयाचा प्रयत्न करू नये असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS