Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनोद कांबळीची पत्नीसह मुलाला मारहाण

वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात मद्यधुंद अवस्थेत

वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला जाणार
टोकियो ऑलिम्पिक : मेरी कोमची विजयी सलामी, पहिला सामना 4-1ने जिंकला l पहा LokNews24
गाडी थांबवून सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित

मुंबई/प्रतिनिधी ः भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कांबळी विरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली. त्यावेळी कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या वांद्रे स्थित फ्लॅटवर आला होता. तिथे त्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना कांबळीच्या 12 वर्षाच्या मुलाने पाहिली. त्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो शांत झाला नाही. त्याने स्वयंपाकघरात धाव घेतील. तेथून पॅन आणून त्याच्या हँडलने अँड्रिया यांना मारहाण केली. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया प्रथम भाभा रुग्णालयात गेली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचली. कांबळीची पत्नी अँड्रियाने तक्रारीत म्हटले आहे की, कांबळीला शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याने विनाकारण मला व माझ्या मुलाशी शिवीगाळ केली. पॅनने मारहाण केल्यानंतर पुन्हा आम्हाला बॅटने मारहाण केली. मी त्याला रोखण्यात यशस्वी झाले. त्यानंतर मुलासह रुग्णालयात पोहोचले. विनोद कांबळीने भारतासाठी एकूण 104 एकदिवसीय व 17 कसोटी सामने खेळले. त्यात त्याने 6 शतकांसह 3,561 धावा केल्या. त्याने कसोटीत 4 व एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 शतके ठोकली. 1991 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या कांबळीची अवघ्या 9 वर्षांत कारकीर्द संपुष्टात आली. त्याने शेवटचा सामना 2000 मध्ये खेळला. याऊलट त्याचा मित्र सचिन तेंडूलकर तब्बल 24 वर्षे देशासाठी खेळला. त्यात अनेक विक्रम रचले.

COMMENTS