Homeताज्या बातम्यादेश

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र

भारताला मोठा धक्का सर्व शक्यतांचा करणार विचार

नवी दिल्ली ः भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळेल अशी आशा कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठल्यानंतर निर्माण झाली होती. मात्र या आशा मावळल्या

पराभवानंतर शाहीन आफ्रीदीबाबत पाकिस्तानचे मोठे विधान.
न्यूझीलंडचे ग्रँट ब्रॅडमन पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक
पुणे येथे लष्करी अधिकारी महिलेची आत्महत्या; वरिष्ठा विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली ः भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळेल अशी आशा कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठल्यानंतर निर्माण झाली होती. मात्र या आशा मावळल्या असून, विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले आहे. निमित्त ठरणे 100 ग्रॅम वजन जास्त. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने विनेशच्या अपात्रतेला दुजोरा दिला आहे. बुधवारी रात्री होणार्‍या 50 किलो गटातील महिला कुस्तीची अंतिम फेरी ती खेळू शकणार नाही. तिला पदकही मिळणार नाही. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे या निर्णयावर अपीलही करता येत नाही. विनेश पहिल्यांदाच 50 किलो गटात खेळत होती. यापूर्वी ती 53 किलोमध्ये खेळायची. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.  विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

वजन कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न- विनेश फोगटने सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. तिने रात्रभर जागून तिचे अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. तिने वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली, तिने स्किपिंग केली. एवढेच नाही तर या खेळाडूने आपले केस आणि नखेही कापल्याचे म्हटले जात आहे.

प्रकृती बिघडली रूग्णालयात दाखल- विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. डीहायड्रेशनचा त्रास होत अल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनेश फोगाटला मंगळवारी एका दिवसात तीन लढती खेळाव्या लागल्या. या तीन लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झाले. म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डीहायड्रेट होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आले. त्यामुळेच जेव्हा विनेश फोगाटचे वजन केले गेले. तेव्हा पोटातील ते लिक्विडमुळे तिचे वजन वाढले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींनी केली चर्चा- विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत, याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे.

COMMENTS